शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक: जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यू बाधितांची संख्या पोहोचली १६४ वर; प्रतिबंधक उपाय सुरु

By suyog.joshi | Updated: June 18, 2024 16:45 IST

गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १२३ रुग्ण बाधित होते

नाशिक (सुयोग जोशी): पावसाळ्याच्या तोंडावरच शहरात डेंग्यू बाधितांची संख्या थेट १६४ वर पोहाेचल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जानेवारी ते जूनपर्यंत डेंग्यू रुग्णसंख्या १६४ व्यक्तींवर गेल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षी जानेवारी ते जून दरम्यान १२३ रुग्ण बाधित होते. तर यावेळेस जानेवारी ते जून पंधरवड्यापर्यंत १६४ जण डेंग्यूने बाधित झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरु असल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.

महापालिकेच्या वतीने उपाययोजना म्हणून शहरातील सहाही विभागात डासोत्पत्ती केंद्र शोधले जात आहे. जेथे-जेथे डासोत्पत्ती केंद्र आढळून येत आहे, ते नष्ट केले जात आहे. शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नसली तरी डेंग्यू रुग्णांची संख्या दीडशे पार गेली आहे. त्यामुळे मलेरिया विभाग सतर्क झाला आहे. मुख्यत: डेंग्यू पावसाळ्यात अधिक दिसून येतो. कारण पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचतात. मात्र, नंतर काही दिवसांनी त्या पाण्यामध्ये डेंग्यूचा संसर्ग करणाऱ्या डासांची उत्पत्ती होते.

तसेच रहिवासी भागातील अपार्टमेंटमध्ये, घरातील गच्चीवर, अडगळीला पडलेल्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी आपल्या परिसरात, घराजवळ पाण्याचे डबके, कुठेही पाणी साचू देऊ नये, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आहे. सहा महिन्यांतच रुग्णसंख्या १६४ वर गेली आहे. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रुग्णालयात जाऊन त्वरित तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

डेंग्यूवर उपाययोजना सुरु आहे. नागरिकांना लक्षणे जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्यावी. जानेवारी ते जूनच्या पंधरवड्यात रुग्णसंख्या १६४वर गेली असून, आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.-डॉ.नितीन रावते, जीवशास्त्रज्ञ मलेरिया विभाग, मनपा.

टॅग्स :Nashikनाशिकdengueडेंग्यू