शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारा ११.६अंश : ऐन मार्चमध्येही नाशिक ‘कुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:20 IST

मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला.

ठळक मुद्देगेल्या वर्षी मार्च ‘हॉट’महाबळेश्वरला किमान तापमान १७ अंश किमान तापमान १६ अंशावरून ११ अंशापर्यंत

नाशिक : मार्च महिन्यात शहराचे किमान तापमान कमी होऊन कमाल तापमानात वाढ होते, असा अनुभव आतापर्यंत नाशिककरांचा राहिलेला आहे. थंडीची तीव्रता कमी होऊन ऊन तापण्यास सुरूवात झालेली असते; मात्र यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे मार्चमध्येही नाशिक ‘कुल सिटी’ असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. शनिवारी (दि.१४) तापमानाचा पारा थेट ११.६अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली.मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. यामुळे मार्च महिना उजाडल्यानंतर थंडीपासून दिलासा मिळेल, अशी आशा नागरिक बाळगून होते; मात्र मागील आठवड्यापासून शहराचे कमाल तापमान व किमान तापमानात घट होण्यास सुरूवात झाली. मागील शनिवारी (दि.७) कमाल तापमान २९.४ तर किमान तापमान १४.८ इतके नोंदविले गेले होते. चार दिवसांपुर्वी तापमान ३१ अंश इतके नोंदविले गेले. सोमवारी (दि.९) कमाल तापमान सर्वाधिक ३२.३ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र त्यानंतर सातत्याने पारा घसरण्यास सुरूवात झाली. कमाल तापमानाचा पारा थेट २७ अंशापर्यंत तर किमान तापमानाचा पाराही हळुहळु ११.६ अंशापर्यंत खाली घसरला. एकूणच किमान तापमान १६ अंशावरून खाली ११ अंशापर्यंत तर कमाल तापमान ३२ अंशावरून २७अंशापर्यंत खाली आले. यामुळे नाशिककरांना गुरूवारपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी पहाटे नागरिकांना हुडहुडी भरली होती. अचानकपणे शहरात थंडी वाढल्यामुळे नागरिकदेखील अवाक् झाले आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला किमान तापमान १७ अंश तर कमाल तापमान २८.४ अंश इतके नोंदविले गेले. 

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान