शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक आयुक्तालय : महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी घेतला कायदासुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:31 IST

नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

ठळक मुद्देबैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’ अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित

नाशिक : शहर-ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध कुमार जयस्वाल यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.आठवडाभरापुर्वी राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून सुबोध कुमार जयस्वाल यांनी पदभार स्विकारला. तत्पुर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. त्यांच्या जागेवर संजय बारवे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. जयस्वाल यांनी महासंचालकपदाचा पदभार स्विकारताच राज्यातील नाशिक शहरात प्रथम दाखल होऊन कायदासुव्यवस्थेचा आढावा जाणून घेला. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह उपआयुक्त, सहाय्यक आयुक्तांसोबत चर्चा करून कायदासुव्यवस्थेविषयी चर्चा केली. आगामी निवडणूक काळात शहरासह जिल्ह्यात कायदासुव्यवस्था राखण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. शहरासह संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांविषयीदेखील त्यांनी चर्चा केल्याचे समजते. सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा झाली आहे. ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये राजकिय पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप तसेच अवैध धंद्यांचा बिमोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरी भागातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शक सुचना करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांना देण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातदेखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महासंचालक जयस्वाल यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण मागील दीड महिन्यात शहरात खूनाच्या सात घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या टोळ्या जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलीस दलापुढे आहे. या बैठकीसाठी नाशिक विभागातील अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेली बैठक तीन वाजता संपतली. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी जयस्वाल यांनी कुठल्याहीप्रकारे संवाद साधला नाही. निवडणूक काळातकायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी विशेष गोपनीय बैठक त्यांनी घेत पोलीस अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्या.--आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’दुपारी बारा वाजेच्या सुमारास महासंचालक जयस्वाल यांची बैठक आयुक्तालयात सुरू झाली. त्यानंतर आयुक्तालयाच्या मुख्य स्वागतकक्षावरून कोणालाही इमारतीत प्रवेश दिला जात नव्हता. सर्वसामान्य नागरिकांपासून तर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही मज्जाव करण्यात आला. आयुक्तालयाच्या इमारतीसह परिसरात अघोषित संचारबंदी यावेळी पहावयास मिळाली. केवळ पोलीस कर्मचा-यांची तुरळक वर्दळ यावेळी दिसून आली. नागरिक व पत्रकारांना स्वागतकक्षाच्या उंबरठ्यावरूनच माघारी फिरावे लागले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस