शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Nashik: स्वच्छ गोदावरी अन‌ प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी अभियानाचा आज शुभारंभ, राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

By suyog.joshi | Updated: October 2, 2023 10:20 IST

Nashik News: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे.

- सुयोग जोशीनाशिक - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे. तर सायंकाळी ६.३० ते ८.३० या दरम्यान शंकराचार्य संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे श्री एम यांचे ‘अध्यात्म आणि सेवा’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद होणार आहे. मंगळवार, दिनांक ३ रोजी सकाळी ७.३० वाजता ब्रह्मगिरीवरील कुंडांचे पुनरुज्जीवन, माती अडवा पाणी जिरवा संकल्पना व प्लास्टिकमुक्त परिसर या चळवळीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या वेळी माझे झाड (माय ट्री) या संकल्पनेचा शुभारंभदेखील करण्यात येणार आहे.

शहरातील पर्यावरण कसे आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वच्छ हवा, नितळ पाणी, हिरवीगार वनराई, डोंगर असतील तर शहरातील पर्यटन चांगले असते, दळणवळण चांगले होते आणि पर्यायाने शहराचा विकास होतो. निसर्गाची सेवा हीच मानवाची सेवा, असे मानणाऱ्या समाजसेवींच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या ‘अविरल गोदावरी’ अंतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर क्षेत्री पर्यावरणीय चळवळीने आकार घेतला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून कामांचा शुभारंभ येथे २ व ३ ऑक्टोबरला होत आहे.

गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडाब्रह्मगिरीवर जेथे गोदामाईचा उगम होतो तेथून प्रवाहाच्या दिशेने जवळपास १०८ कुंड असून त्यातील काही कुंड स्वच्छ करण्याचे काम झाले आहे. या कुंडांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जयपूर येथे झालेल्या ‘सी २०’ कॉनक्लेव्हमध्ये डॉ. राजेंद्र सिंह यांनी बनवलेला गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा सादर झाला. नदी कशी वाहती होईल, याविषयी झालेली सकारात्मक चर्चा अखंड कार्याच्या रूपाने सुरू झाली आहे.

देशव्यापी चळवळ होईलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रियायोगाचे गुरू तसेच पाणी चळवळीचे प्रणेते श्री एम आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाणीवाले बाबा म्हणून  प्रसिद्ध  डॉ. राजेंद्रसिंह यांचा मिलाफ एखाद्या चळवळीत झाला तर हा मणिकांचन योग म्हणावा लागेल. ती चळवळ नक्कीच देशव्यापी रूप धारण करून आपला एक मानदंड जगासमोर ठेवेल यात शंका नाही. या दोन्ही महानुभावांनी नाशिकची गोदावरी व त्र्यंबकेश्वरीचा ब्रह्मगिरी याप्रश्नी लक्ष घातले असून स्वच्छ गोदावरी व प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरीची हाक नाशिककरांना दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक