शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या उद्योजकाची गोळी झाडून घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 02:07 IST

सटाणा शहरानजीक असलेल्या यशवंतनगर जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे(वय ५५, सामोडे, साक्री. हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

ठळक मुद्देसटाण्याची घटना : पोलिसांकडून तपास सुरू

सटाणा : शहरानजीक असलेल्या यशवंतनगर जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स दुकानासमोरील हायवेवर नंदलाल गणपत शिंदे(वय ५५, सामोडे, साक्री. हल्ली मुक्काम नाशिक) यांनी त्यांच्या स्वमालकीच्या स्कोडा कारमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.बुधवारी (दि. ७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, आत्महत्या केलेले नंदलाल शिंदे हे मोठे उद्योजक असल्याची माहिती मिळते आहे.  नंदलाल शिंदे हे स्वत:च्या स्कोडा रॅपिड कारमधून (क्र. एमएच १५ एफटी ०१३३)) सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. नंदलाल शिंदे हे ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर जवळ आले असता त्यांचे मावसभाऊ यांच्याशी बोलणे झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.  माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून मी सटाण्याजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे त्यांनी मावस भावाला मोबाइलद्वारे कळविले होते. शिंदे यांचा मावसभाऊ व इतर नातेवाईक ताहाराबादजवळ होते. मावसभाऊ व नातेवाईक जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर पोहोचले असता नंदलाल शिंदे हे स्कोडा कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातसिडको : नंदलाल शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान,  बुधवारी रात्री उशिरा सिडकोतील मोरवाडी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगर भागात शिंदे  कुटुंबासह राहतात. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे .शिवसेनेचे पदाधिकारी मामा ठाकरे यांचे ते भाचे होत. नंदू शिंदे हे मूळचे समोडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील असून व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून ते नाशिक येथे स्थायिक आहेत. त्यांची सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनी आहे.  राजकारणात ते आधी मनसेनंतर भाजपमध्ये कार्यरत होते. महिन्द्र ॲण्ड महिन्द्र कंपनीचे ते माजी पदाधिकारी, तर निमा या उद्योजकांच्या संघटनेवर संचालकपदावरही होते. 

रिव्हॉल्व्हर ताब्यातपोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले. घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून, पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी