शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:02 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरिता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून, आठ पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. गुरुवारी (दि.२५) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी करतील.

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरिता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून, आठ पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. गुरुवारी (दि.२५) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी करतील.  नाशिक शाखेतून तीन जागांसाठी शाखेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य राजेंद्र जाधव, नाट्यलेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, दीपक मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायधनी, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बुधवारी (दि.२४) नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या कार्यालयात उमेदवारांची एकत्रित बैठक होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, सुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर एकमत झाले. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी सांगितले, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पाच उमेदवार प्रा. रवींद्र कदम, राजेंद्र जाधव, दत्ता पाटील, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांनी स्वेच्छेने आपले माघारी अर्ज शाखेकडे दिले आहेत. सुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, पाचही उमेदवारांचे माघारी अर्ज निवडणूक अधिकाºयाकडे सुपूर्द केले जातील.रंगकर्मींमध्ये कटुता असू नये आणि शाखेचाही निवडणूक खर्च वाचावा यासाठी बिनविरोध निवडीसाठी संबंधित उमेदवारांनी सहकार्यभाव दाखविला. सुनील ढगे हे गेल्या पंचवार्षिक काळात मध्यवर्ती शाखेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत शाखेला अनेक उपक्रम राबविता आले. सुरेश गायधनी यांनीसुद्धा यापूर्वी मध्यवर्ती शाखेवर काम केले असल्याने त्यांचा दीर्घ अनुभव आहे. सचिन शिंदे यांच्यासारखा प्रतिभावान कलावंत, दिग्दर्शक या निमित्ताने मध्यवर्ती शाखेवर जाणार आहे. त्यामुळे, येत्या पाच वर्षांत नाशिक शाखेला उत्तमोत्तम काम करण्याची संधी लाभणार असल्याचेही प्रा. कदम यांनी सांगितले. शाखेची पहिल्यांदाच बिनविरोध निवड होत असल्याचेही प्रा. कदम यांनी सांगितले. यावेळी, सुनील ढगे, दत्ता पाटील, सचिन शिंदे, गिरीश गर्गे तसेच सुरेश गायधनी यांचे प्रतिनिधी कुंतक गायधनी आणि प्रफुल्ल दीक्षित यांचे प्रतिनिधी म्हणून राजेश भुसारे उपस्थित होते. आज माघारीचा दिवसमध्यवर्ती शाखेची निवडणूक ४ मार्चला होणार असून, गुरुवारी (दि.२५) अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. शाखेकडे पाचही उमेदवारांनी आपले माघारी अर्ज दिल्याने ते निवडणूक अधिकाºयाकडे जमा केले जाणार आहेत. दरम्यान, नाशिकप्रमाणेच धुळे-जळगाव आणि अहमदनगर शाखेचीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुनील ढगे यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातून सात उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक