- अशोक बिदरी नाशिक - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनमाड दौऱ्यावर येत असून टंचाईग्रस्त मनमाडसाठी महत्त्वाकांक्षी असलेली 311 कोटीच्या करंजवण-मनमाड पाणी योजनेचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. महर्षी वाल्मिक स्टेडियमवर पन्नास हजार क्षमतेच्या भव्य व आकर्षक सभामंडप उभारण्यात आला असून, सोमवारी आज सकाळी साडेदहा वाजता होणार मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह पाच मंत्रीही उपस्थित राहणार यावेळी विविध विकास कामांचे उदघाटनही होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली.
Nashik : करंजवन योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 09:56 IST