- संजय पाठकनाशिक - लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा बोलबाला दिसताच अनेक माजी नगरसेवकांनी उध्दव सेना तसेच शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणूकीत महायुतीचे कमबॅक हेाताच हेच माजी नगरसेवक आणि नेते पुन्हा सत्तारूढ पक्षाकडे येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील यांनी आज अशाच प्रकारे शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला.
यापूर्वी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी अशाच प्रकारे प्रवास बदलला. माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पवन पवार यांनी यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी उध्दव सेनेत प्रवेश केला हेाता. मात्र, राज्यात महायुतीची सत्ता येताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. आता नाना महाले आणि माजी नगरसेवक दत्ता पाटील यांनीही तेच केले आहे. आज मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ. अपूर्व हिरे उपस्थित होते.