शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

Nashik: सिन्नरच्या १३ हजार हेक्टर सिंचनासाठी ७५०० कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव !

By धनंजय रिसोडकर | Updated: September 8, 2023 15:58 IST

Nashik News:

- धनंजय रिसोडकर  नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणारा व ५.६ टीएमसी क्षमतेचा दमणगंगा -वैतरणा - कडवा- देव नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार हा नदीजोड प्रकल्प ७५०० कोटी रुपयांचा असून त्यामुळे सिन्नर तालुक्यांतील १३ हजार ८०० हेक्टर सिंचन होणार आहे.

त्याशिवाय दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्याची राज्यभरातील दुष्काळी परिस्थिती बघता हा प्रकल्प लवकरच मार्गी लागू शकतो. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटीने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दमणगंगा व वैतरणा खोर्यातील निळमाती, मेट, कोशिमशेट, उधळे येथे बंधारे बांधणे. ऊर्ध्व वैतरणा-कडवा ते बोरखंड धरणांचा उपयोग करून पाणी वळविणे. या चार जलाशयांमधील पाणी वैतरणा धरणात आणून तेथून २८ किलोमीटर पाइपने कडवा धरणात टाकणे. तसेच बोरखिंड ते देवनदीदरम्यान पाइपलाइन व बोगद्याद्वारे पाणी सिन्नर तालुक्यात देवनदीच्या उगमस्थानापर्यंत आणून तेथून ते सिन्नरच्या पूर्वभागापर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या वीजेची गरज भागवण्यासाठी १३० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा खर्चही या सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNashikनाशिक