शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नारपारची संजीवनी नांदगावला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:39 AM

नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगडकरी यांचे राज्य सरकारला पत्र पाणी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला बळ

संजीव धामणे ।नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.नारपार प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश होण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला सूचित केले आहे. या संदर्भातील पत्र केंद्रीय जलसंसाधन विभागाचे विशेष अधिकारी यांच्याकडून पाणी संघर्ष समितीचे समाधान पाटील व डॉ. प्रभाकर पवार यांनी मिळविले असून, या लढ्यात सर्वपक्षीयांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील मोरझर परिसरात अत्यल्प पर्जन्यामुळे नागरिकांना स्थलांतराची वेळ आली आहे. पाणी कोठून आणता येईल, पर्जन्य विभाग काही मदत करू शकेल का याचा सन २०१५ पासून समितीने पाठपुरावा सुरू केला. तेव्हा नारपारमध्ये नांदगावचा समावेश करण्यात आलेला नव्हता. विविध शासकीय व प्रशासकीय स्तरावरील लोकांच्या गाठीभेटी घेत असताना नारपार प्रकल्पातून शाश्वत व कमी खर्चात पाणी मिळू शकते याची माहिती पाटील-पवार द्वयींना मिळाली. आंदोलने करून पाणी मागण्याआधी शास्त्रीय माहिती मिळवावी म्हणून अभियांत्रिकी ज्ञान व भौगोलिक चढउतार यांची माहिती संकलित करण्यात आली. आवश्यक नकाशे, समुद्रसपाटीपासूनची उंची यांचे कागद गोळा करत असताना तालुक्याच्या उंबरठ्यावरून दुसरीकडे जाणारा नारपार प्रकल्पाचा कालवा समोर आला. मनमाड अनकाईपासून जाणाऱ्या या कालव्याला टॅप केले तर? त्याची उंची ६२२ मीटर असल्याने व तालुक्यातील धरणे व गावांची उंची त्यापेक्षा कमी असल्याने गुरुत्वाकर्षणाने पाणी येऊ शकते हे स्पष्ट झाले.नारपारचा डीपीआर बनविण्यासाठी राष्ट्रीय जलनियामक प्राधिकरण, इंटरनशनल कन्सल्टंट इन वॉटर रिसोर्स पॉवर व इंफ्फ्रा. डेव्हलपमेंट या कंपन्या काम करत आहेत. नांदगावचा समावेश डीपीआरमध्ये करण्यात यावा असे केंद्र सरकारचे पत्र राज्य सरकारचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आणि तापी पाटबंधारे विभाग मंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी यांना प्राप्त झाले असून, संघर्ष समितीचे पाटील व पवार यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. डॉ. प्रवीण निकम, उदय पाटील हे त्यांच्यासह होते.तालुक्यात शेती सिंचनाचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. येथील खुंटलेल्या विकासात व शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून त्याचे प्रतिबिंब दिसून येते. शेतीसाठी पाणी हा आजपर्यंत केवळ कल्पनाविलासच ठरला आहे. उपलब्ध माहितीनुसार नांदगाव तालुक्याचे दरडोई उत्पन्न आदिवासी तालुक्यांच्या बरोबरीने आहे. ही परिस्थिती नारपारच्या पाण्याने बदलू शकते. प्रशासनातल्या अधिकाºयांनी कालव्याला टॅप करून तालुक्यातील नाग्यासाक्या, दहेगाव, माणिकपुंज, मनमाड शहरासह अनेक छोटी धरणे, नद्या व नाले भरू शकतात याची पुष्टी केली. सध्या तालुक्यात पाणी साठवण क्षमता फक्त १.५ टीएमसी आहे. ती वाढवावी लागणार आहे.