शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नार-पारचे पाणी गुजरातला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:52 IST

माकपा व किसान सभेच्या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नाबाबत सादरीकरण करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार अधिवेशन संपल्यावर शुक्र वारी (दि.१) सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये महाराष्ट्राचे नार-पारच्या खोऱ्यातील १५ टीएमसी पाणी (४३४ दलघमी) गुजरातला देण्यासंदर्भात राज्य सरकार राजी झाल्याची माहिती चहल यांनी दिल्याने सरकारच्या या भूमिकेला उपस्थितांना जोरदार आक्षेप घेतले.

ठळक मुद्देसरकारचा इरादा : नदीजोड संदर्भात जलसंपदा विभागाची बैठक

नाशिक : माकपा व किसान सभेच्या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नाबाबत सादरीकरण करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार अधिवेशन संपल्यावर शुक्र वारी (दि.१) सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये महाराष्ट्राचे नार-पारच्या खोऱ्यातील १५ टीएमसी पाणी (४३४ दलघमी) गुजरातला देण्यासंदर्भात राज्य सरकार राजी झाल्याची माहिती चहल यांनी दिल्याने सरकारच्या या भूमिकेला उपस्थितांना जोरदार आक्षेप घेतले. मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार जे.पी. गावित, आमदार पंकज भुजबळ, अभियंता राजेंद्र जाधव, सुनील मालुसरे, अ‍ॅड. दत्तू पाडवी, राजेश सोनवणे आदी उपस्थित होते. आंतरराज्य सामंजस्य करार केला तरच महाराष्ट्रातील या नदीजोड प्रकल्पांना केंद्राकडून आर्थिक मदत देऊ अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली असल्याचे सांगण्यात आले. सादरीकरणास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पवार, उपसचिव आर. आर. शुक्ला, कोकण खोऱ्याचे इ. डी. अन्सारी, आमले आदी उपस्थित होते.सौरऊर्जा प्रकल्पाच्या सूचना मान्यमहाराष्ट्राच्या हद्दीत एकूण ५ नदीजोड प्रकल्प घेण्याचे राज्य सरकारने मान्य केले असल्याची माहितीही जाधव यांनी दिली आहे. यामध्ये नार-पार -गिरणा लिंक १३ टीएमसी, पार-कडवा लिंक ३ टीएमसी, दमणगंगा एकदरे-गोदावरी लिंक ५ टीएमसी, गारगाई-वैतरणा कडवा देव लिंक ७ टीएमसी, तर दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प २०.४ टीएमसी असे एकूण ४८.४ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व प्रकल्पांतून पाणी उपसा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची तरतूद प्रकल्प अहवालात करण्याची सूचना बैठकीत मांडण्यात आली. या सूचनेचे प्रधान सचिव चहल यांनी स्वागत केले व केंद्र सरकारला याबाबत पत्रव्यवहार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी