शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

विधानपरिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे, भाजपाची दुहेरी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:47 IST

राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजप खेळू पाहत आहेत

ठळक मुद्देभुजबळांना देणार शह : शिवसेनेच्या वर्चस्वाला लगामस्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तुर्त तरी भाजपाची आघाडी

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ पाहणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजप खेळू पाहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तुर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित त्यामागे मांडण्यात आले आहे.नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी, त्यांच्या महाराष्टÑ स्वाभीमानी पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राणे यांना राज्यमंत्रीमंडळात प्रवेश देण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षावर येवून पडली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसे वारंवार संकेतही दिले आहे. दोन दिवसांपुर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. राजकीय पातळीवर विधीमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करण्यावर भाजप-सेनेत एकमत झालेले आहे. त्यावेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सदस्याला सहा महिन्याच्या आत विधानपरिषद वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अलिकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाºया नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे खात्रीशीर सुत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यापासून तुरूंगात असलेले छगन भुजबळ नजिकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांचा भाजपाला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील अशा वेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. या शिवाय जिल्ह्यात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गंत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिम्मत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक