शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
6
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
7
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
8
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
9
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
10
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
11
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
12
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
13
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
14
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
15
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
16
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
17
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
18
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
19
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
20
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...

नारायण राणेंकडून नाशिक मुक्कामी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:25 PM

दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत्वावर डोळा ठेवून मंगळवारी वेळात वेळ काढून महोत्सवाला भेट दिली असून, या भेटीपेक्षाही नाशिक मुक्कामी त्यांनी भाजपाच्या स्थानिक लोक प्रतिनिधींबरोबरच अन्य पक्षीय सहकाºयांशी केलेले गुप्तगू अधिक महत्त्वाचे ठरले आहे.

नाशिक : दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत्वावर डोळा ठेवून मंगळवारी वेळात वेळ काढून महोत्सवाला भेट दिली असून, या भेटीपेक्षाही नाशिक मुक्कामी त्यांनी भाजपाच्या स्थानिक लोक प्रतिनिधींबरोबरच अन्य पक्षीय सहकाºयांशी केलेले गुप्तगू अधिक महत्त्वाचे ठरले आहे.  नारायण राणे यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सर्वाधिक चर्चा त्यांच्या भाजपा प्रवेशाची झाली, मात्र भाजपाने नाकारल्यामुळे राणे यांनी त्यांच्या स्वत:च्या महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षालाच राज्यात बळकट करण्याचा, त्याचा सशर्त पाठिंबा भाजपाला देण्याची घोषणा केल्यामुळे राणे यांचे भाजपाशी असलेले साटेलोटे लपून राहिलेले नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या समारोपात राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिल्याने यासंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांचे भवितव्य निश्चित होणार असून, मंत्रिमंडळात समावेशानंतर सहा महिन्यांत राणे यांना विधीमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ व नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असे दोनच पर्याय निवडून जाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदारांची संख्या आटोपशीर व हाताळणे सोपे असल्याने राणे यांची पसंती आहे, शिवाय भाजपाकडेही राणे यांना निवडून  आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौºयावर असताना नारायण राणे यांनीही कोकण महोत्सवाला भेट देण्याच्या निमित्ताने नाशिक वारी केली आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राणे हे हेलिकॉप्टरने नाशिक मुक्कामी येणार होते, परंतु ऐनवेळी तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर रद्द करून राणे यांनी मोटारीने नाशकात येणे पसंत केले. राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्तीने ठेवली बडदास्त एका खासगी हॉटेलमध्ये राणे यांचा मुक्काम असला तरी, त्यांची सारी व्यवस्था राष्टवादीशी संंबंधित असलेल्या व्यक्तीने केल्याचे सांगण्यात आले. राणे यांची भेट घेण्यासाठी भाजपाच्या लोकप्रतिनिधींसाठी यापूर्वीच वेळ राखून ठेवण्यात आली. शिवाय अन्य पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध पाहता, रात्री उशिरापर्यंत राणे यांच्या भेटीसाठी चोरी, छुप्या पद्धतीने अनेकांनी हॉटेल गाठले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Politicsराजकारण