शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नराधमास अटक : आठ वर्षाच्या बालिकेसोबत झालेल्या अत्याचाराने नाशिक हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 20:20 IST

‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील छतावर नेले. तेथून नराधम कोकणी हा बालिकेला स्वत:च्या राहत्या खोलीत घेऊन गेला. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत बालिकेवर बळजबरीने...

ठळक मुद्देमहालक्ष्मीनगर भागात बालिकेवर लैंगिक अत्याचारजमलेल्या रहिवाशांनी कोकणी यास चोप दिलापरिसरात संतापाची लाट उसळली

नाशिक : हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच नाशिक मधील अंबड भागामध्ये आठ वर्षीय बलिकेवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.८) दुपारी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी संशियत नराधमाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देशातील हैदराबाद, व उन्नाव येथील बलात्काराच्या घटना घडल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच रविवारी दुपारी नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात एका आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

महालक्ष्मीनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह, भाडेतत्वावर घर घेऊन राहायला आले होते. याठिकाणी पुर्वीपासून राहत असलेल्या कैलास रामू कोकणी (२३) याने कुटुंबातील एका आठ वर्षाच्या बालिकेला ‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील छतावर नेले. तेथून नराधम कोकणी हा बालिकेला स्वत:च्या राहत्या खोलीत घेऊन गेला. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला. काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्याचवेळी जवळच राहणाऱ्या कोकणीला याबाबत विचारणा करण्यासाठी पिडित बालिकेच्या आईने हाक मारली असता संशयित कोकणी याने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बलिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. भेदरलेल्या मुलीने तत्काळ आईला मिठी मारत घडलेला प्रकार रडत रडत कथन केला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील रहिवाशांनी संशयित कोकणी यास चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित कोकणी यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत कोकणीविरूध्द बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारhyderabad caseहैदराबाद प्रकरण