शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

नाणेगाव, पळसेला वीज पडून दोन ठार

By admin | Updated: June 4, 2014 01:24 IST

नाशिक : तालुक्यातील नाणेगाव व पळसे येथे दोन ठिकाणी वीज पडून एक तरुण व तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली.

 

नाशिक : तालुक्यातील नाणेगाव व पळसे येथे दोन ठिकाणी वीज पडून एक तरुण व तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली. तालुक्यातील बहुतांशी गावांना वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, रात्री उशिरापर्यंत महसूल कर्मचारी पंचनामे करीत होते. तालुक्यातील शिंदे, पळसे, नाणेगाव, हिंगणवेढे येथे झोडपून काढणार्‍या पावसाने दाणादाण उडविली. त्यातच नाणेगाव येथे समाधान दाते (२८) या तरुणाच्या अंगावर वीज पडली. समाधान हा त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव त्र्यंबक येथील मूळ राहणारा असून, नाणेगावच्या सोमनाथ शिंदे यांच्याकडे तो पाहुणा म्हणून आला होता. विजेचा कडकडाट होत असल्यामुळे तो बचावासाठी गावातील झाडाखाली थांबला व तेथेच त्याच्यावर वीज कोसळली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अंगावर वीज पडून जागीच ठार झालेली पळसे येथील रूपाली आगळे ही कालच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आनंदात होती. तिची मोठी बहीण प्रसूत झाल्याने आई-वडील पळसे गावातीलच दवाखान्यात गेलेले होते, तर तिच्या पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी भाऊ सकाळीच पुण्याला रवाना झाला होता. घरात रूपाली एकटीच होती. याच दरम्यान वीज कडकडू लागल्याने अंगणात झाडाखाली बांधलेला बैल सोडण्यासाठी रूपाली घराबाहेर पडली. तिच्या हातात त्यावेळी भ्रमणध्वनी होता. अचानक जोरदार वीज कोसळली व तिने रूपालीला लक्ष्य केले. विजेच्या आवाजाने बैलाने मात्र धूम ठोकली.