शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 23:52 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा दिवसांपासून ठप्प असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाचा फटका : पाणी विकत घेण्याची वेळ; नळ पाणीपुरवठा योजना ठप्प

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा दिवसांपासून ठप्प असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.कणकोरी पाच गाव पाणीपुरवठा योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला नळ पाणीपुरवठा केला जात आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ व मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भोजापूर धरणावरील योजनेवर अवलंबून रहावे लागते. गेल्या सहा ते सात वर्षांपासून गावाला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.गेल्या बुधवारी (दि.३) निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. धरण परिसरात जाणाऱ्या एक्स्प्रेस फीडरवरील सहा ते सात वीजखांब कोसळल्याने कणकोरीसह पाच गाव व मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून वीजवितरणकडून वीजखांब उभारण्याचे काम सुरू आहे.नांदूरशिंगोटे गावात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. यावेळी तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, मंगेश शेळके, सुदाम आव्हाड, संतोष ननावरे, श्रीकांत वाघचौरे, बाळासाहेब ननावरे, शिवाजी लोहकरे, संतोष कुचेकर, शरद शेळके, सचिन पठारे, लहू पठारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात