शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:00 IST

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे.

ठळक मुद्देक्षमता १०५० दशलक्ष घनफूट : आता होतो केवळ २५० साठा; तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे.धरणात गोदावरी, कादवा, बाणगंगा नदीचे पाणी येते, तर गंगापूर, दारणा, वालदेवी, मुकणे, कडवा, ओझरखेड या नाशिक जिल्ह्यातील मोठ्या धरणांतील पाणी येते.धरण बांधले तेव्हा धरणाची पाणी साठवणूक क्षमता १०५० दशलक्ष घनफूट होती. अनेक दशकानंतर गाळ साचल्याने आज केवळ २५० दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक होईल एवढेच शिल्लक राहिले आहे.मोठी क्षमता असलेले धरण आज कादवा, गोदावरी नदीच्या प्रवाहात वाहत येणाऱ्या गाळामुळे जवळपास ७० टक्के भरले असून, क्षमता कमी झाल्याने सलग दुसºया वर्षी धरण कोरडेठाक पडले. अनेक दशके तळ पाहिला नसल्याने आता सलग तीन वर्षांपासून कोरडे पडत असल्याने धरणाची क्षमता कमी झाली असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.यामुळे भविष्याचा मोठा धोका वाढतो आहे.नांदूरमधमेश्वर धरण क्षेत्रात काळी सुपीक जमीन आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आल्याने माती वाहून येते. वर्षानुवर्षे वाहत येणाºया मातीने धरण गाळयुक्त झाले आहे. धरणात जलसाठा होईल इतकी जागाच शिल्लक राहिली नाही. मुख्य दरवाजे असलेल्या ठिकाणी अवघे पाच ते सात फूट उंची शिल्लक आहे, तर काही ठिकाणी गाळ पूर्णपणे धरण भिंतीच्या समांतर साचत आला आहे.गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की गोदावरीला पूर येतो. सायखेडा, चांदोरी या गावांना पुराचा फटका बसतो.धरण लाभक्षेत्र असलेल्या गावांना सलग तीन वर्षांपासून एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. धरण क्षेत्र असल्याने पावसाळ्यात पूर येतो, त्यामुळे शेतात कोणतेही पीक येत नाही. घेतले तरी जास्त पाण्यामुळे खराब होते, अशा ठिकाणी केवळ उन्हाळ्यात चांगले पीक येते; मात्र तीन वर्षांपासून धरण कोरडेठाक पडत असल्याने पाणी कमी पडते, पीक घेता येत नाही. धरण क्षेत्र असूनही शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही.पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. धरण गाळमुक्त झाले तर उन्हाळ्यात जलसाठा टिकून राहील. पर्यायाने पाणी असल्याने शेतात उन्हाळपिके घेता येतील. यासाठी कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे. शासनाने त्वरित गाळमुक्त धरण करावे, अशी मागणी शेतकरी, सामान्य नागरिक करीत आहेत.गाळमुक्त धरण करण्याची आवश्यकता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येते. अनेक ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी नदी, तलाव, ओहळ यांची खोलीकरण करून क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर धरणातील गाळ काढून गाळमुक्त धरण केल्यास पाण्याची क्षमता वाढेल आणि लाभ क्षेत्रातील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो, त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.२ दहा वर्षांपूर्वी धरणाला आठ वक्र ाकार गेट तयार करण्यात आले; मात्र वक्र ाकार गेटमधून गाळ बाहेर पडत नाही. साचलेला गाळ आणि गेट यात अंतर असल्याने केवळ पाणी वाहून जाते. गाळ वाहून जात नसल्याने वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे धरण गाळाने भरले आहे. पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे.