शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने नाशिककर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:04 IST

थंडीचा कडाका शहरासह जिल्ह्यात कायम असून, शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.३०) किमान तापमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला असला तरी कमाल तापमानाने पंचविशी गाठली असल्याने रविवारी दिवसभर थंड वारे वेगाने वाहत होते. परिणामी वातावरणात गारठा कायम राहिल्याचा अनुभव नाशिककरांना आला. रविवारी किमान तापमान ७ अंश इतके नोंदविले गेले. निफाडचा पारा थेट २.८ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

ठळक मुद्देहुडहुडी : तापमानाचा पारा ७ अंशांवर बाजारपेठांमधील गर्दी रोडावली रविवार ठरला कोल्ड‘वार’

नाशिक : थंडीचा कडाका शहरासह जिल्ह्यात कायम असून, शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.३०) किमान तापमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला असला तरी कमाल तापमानाने पंचविशी गाठली असल्याने रविवारी दिवसभर थंड वारे वेगाने वाहत होते. परिणामी वातावरणात गारठा कायम राहिल्याचा अनुभव नाशिककरांना आला. रविवारी किमान तापमान ७ अंश इतके नोंदविले गेले. निफाडचा पारा थेट २.८ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारत गारठला असून, त्याचा प्रभाव उत्तर महाराष्टÑावरही झाला आहे. विदर्भामधील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, औरंगाबाद ही सगळी शहरे गारठली आहेत. महाबळेश्वरमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला असून नाशिक, मालेगावमध्ये ७ अंश इतके तापमान रविवारी नोंदविले गेले. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे.गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामात नोंदविले गेले होते. मात्र चालू वर्षी डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरला. निफाड तालुका रविवारी संपूर्णत: गोठला होता.सुटी असूनही बाजारपेठा ओसनाशकात बोचºया वाºयांनी कुडकुडणाºया नागरिकांना दिवसाही घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने सायंकाळनंतर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. रविवारची सुटी असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही.दिवसभर बोचरी थंडीदिवसभर नागरिकांना बोचºया थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. मागील चार ते पाच दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद शनिवारी झाली. ५.१ अंश ही या हंगामातील नीचांकी नोंद ठरली.जॉगिंग ट्रॅकवरही गर्दी कमीिदवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वाºयाचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सूर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता. रविवारी पहाटे नागरिकांनी घरबाहेर पडणे पसंत केले नाही. परिणामी जॉगिंग ट्रॅकवरील संख्या रोडावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान