शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव मतदारांची नावे यादीतून गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:45 IST

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.

ठळक मुद्देन्याय मिळत नाही : २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.विशेष म्हणजे मतदार याद्यांचे काम करणाऱ्या बीएलओ ग्रामसेवकांनी देखील आपल्या संमतीशिवाय नावे कमी झाल्याचे लेखी पत्र नांदगावच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून याबाबतचा पाठपुरावा सुरु असतांना दाखल करण्यात आलेल्या अपिलावर नांदगाव येथील सहाय्य्क विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही असा आरोप साहेबराव घुगे यांच्यासह गावातील नावे कमी झालेल्या मतदारांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांचे प्रकटीकरण जाहीर झाल्यापासून आता अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीचा दिवस जवळ येऊनही याबाबत निर्णय झाला नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.नावे कमी झालेल्या मतदारांनी आता जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान याबाबत आपल्याकडे जेऊर गावातील ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून त्याची शहानिशा सुरु असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय कुलकर्णी यांनी दिली.नांदगाव विधानसभा मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यातील जेऊर गावातील मतदार यादीचा भाग १०६ व १०७ मधील एकूण १६४ मतदारांची नावे ते स्थलांतरित झाली असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर नांदगाव येथील निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या लेखी पत्रावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे प्रत्यक्षात सदरची सही आपली नसल्याचा खुलासा ग्रामसेवक भामरे यांनी नांदगावच्या तहसीलदारांना २६ ऑक्टोबरला दिलेल्या लेखी खुलाशात केला आहे. कुणाचेही नाव कमी केले नसल्याचे आपल्या जबाबात भामरे यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे सुनील कुटे व भालचंद्र साळुंके या संबंधित प्रभागाच्या बीएलओ यांनी आपण निवडणूक शाखेला मतदारांची नावे कमी केल्याबाबत कुठल्याही प्रकारची लेखी माहिती भरून दिली नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. त्यामुळे नावे कमी झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान २६ तारखेला आपण नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती साहेबराव घुगे यांनी दिली. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान