शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटक सुरु करण्याच्या मागणीसाठी नांदगावी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:10 IST

नांदगांव : रेल्वे स्टेशनवरच्या प्रवासी गाड्यांचे एका पाठोपाठ सात थांबे कोविडच्या निमित्ताने बंद केल्याने, तसेच अरुंद भुयारी पूल, बंद झालेले रेल्वे फाटक, यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मी नांदगावकर या निशाणाखाली एकत्र येऊन, बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत, १०० टक्के बंद पाळत मोर्चा काढला.

ठळक मुद्देबंदला उत्स्फूर्त प्रतिसाद : फाटकाला पर्यायी व्यवस्थेची मागणी

सकाळी ११वा. शेकडोंच्या संख्येने रेल्वे स्टेशनवर जमा झालेल्या नागरिकांनी, नजीकच्या काळात रद्द केलेले थांबे सुरू केले नाही, तर शहरवासीयांची सहनशीलता संपुष्टात येईल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. आमदार सुहास कांदे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. स्टेशन प्रबंधक विश्वजीत मीना यांना कांदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. थांबे रद्द केल्यामुळे असंतोष धुमसत असतांनाच्या काळात, रेल्वे फाटकाला पर्यायी सबवे देताना, त्याची बांधणी वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यामुळे नाराजी निर्माण झाली व त्यात फाटक एकदमच बंद केल्याने ठिणगी पडली. गांधी चौकात सकाळी ११वा. शेकडो नागरिक जमले. राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्याला हार घालून सर्वांनी रेल्वे स्टेशनकडे कूच केले. तत्पूर्वी संतोष गुप्ता यांनी मोर्चाला संबोधित केले. रेल्वे प्रवासाची मोठी गैरसोय झाल्याने, नागरिकांची मन:स्थिती दुसऱ्या गावी राहायला जाण्याची झाली आहे. गाड्या थांबविण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितला नसून, ती जबाबदारी केंद्राची आहे. अन्याय होणार असेल, तर मी नांदगावकर म्हणून जनतेच्या बाजूने उभा आहे, प्रसंगी लोकशाही मार्गाने रुळावर झोपून आंदोलन करावे लागले, तरी करेन, अशी याची ग्वाही आमदार  कांदे यांनी दिली.मोर्चा संपल्यावर खासदार भारती पवार यांचे येथील शासकीय विश्राम गृहात आगमन झाले. त्यांनी थांबे सुरू करण्यासाठी असलेल्या कोविड तपासणीविषयीच्या अडचणी मांडून सध्या सुरू असलेल्या गाड्या स्पेशल गाड्या आहेत. प्रवासी संख्येचा निष्कर्ष प्रशासनाने थांब्यासाठी लावला, तरीही माझा पाठपुरावा सुरू असून, सकारात्मक उत्तराची अपेक्षा असल्याचे सांगितले. मात्र, त्यास उपस्थित नागरिकांनी तीव्र विरोध केला. यावेळी पवार यांनी सात गाड्यांपैकी कोणत्याही दोन एक्स्प्रेस गाड्याना थांबा मिळवून देण्याची तयारी दाखविली. महानगरी, काशी व कामायनी अशा तीन गाड्यांचे थांबे द्यावेत, अशी मागणी सुमित सोनवणे यांनी केली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक