शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदासाठी भुसे, झिरवाळ, खोसकरांची नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 20:17 IST

राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना राष्टÑवादीकडून छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. भुजबळ यांच्याकडे काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या युती

ठळक मुद्देपक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग : छगन भुजबळांचे मत निर्णायकआजवरच्या सर्वच मंत्रीमंडळात नाशिक जिल्ह्याला चांगले स्थान

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेतील पहिल्या टप्प्यात राष्टÑवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना व कॉँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रीपदात जिल्ह्यातील कोणत्या आमदाराची वर्णी लागते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असून, सेनेकडून पुन्हा एकवार दादा भुसे यांचे तर कॉँग्रेचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांच्याही नावाची चर्चा होत आहे. राष्टÑवादीच्या वाट्याला आणखी एक राज्यमंत्रीपद आलेच तर माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांच्या समर्थकांनाही आस लागून आहे.

राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना राष्टÑवादीकडून छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. भुजबळ यांच्याकडे काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला शिवसेनेने एकमेव राज्यमंत्रीपद दादा भुसे यांना देण्यात आले होते. तर जळगावचे गिरीष महाजन यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. त्यामुळे आजवरच्या सर्वच मंत्रीमंडळात नाशिक जिल्ह्याला चांगले स्थान मिळालेले असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्टÑवादी व कॉँग्रेस असे तिन्ही पक्ष सहभागी झाले असल्यामुळे तिन्ही पक्षाच्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्यचाी आशा आहे. सर्वाधिक सहा आमदार राष्टÑवादीचे त्या खालोखाल सेनेचे दोन व एक कॉँग्रेसचा आमदार असून, त्यापैकी पहिल्याच टप्प्यात कॅबिनेटमंत्री म्हणून राष्टÑवादीने छगन भुजबळ यांचा शपथविधी करून घेतला आहे. त्यामुळे आता नंतर कोण याची उत्सूकता लागलेली असून, सेनेकडून दादा भुसे यांचे नाव घेतले जात आहे. भुसे हे चौथ्यांदा निवडून आले असून, गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाच वर्षे राज्यमंत्रीपदाचा कारभार हाकलल्याचा अनुभव गाठीशी आहे. तर कॉँग्रेसकडून हिरामण खोसकर यांनाही मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाचा एकमेव आमदार असल्याने त्यांच्या मंत्रीपदाचा लाभ पक्ष संघटना वाढीसाठी होऊ शकतो असा अंदाज त्यामागे बांधला जात आहे. या उपरही राष्टÑवादीची जिल्ह्यातील ताकद लक्षात घेता, जिल्ह्याच्या वाट्याला राष्टÑवादीकडून आणखी एक राज्यमंत्रीपद मिळाले तर माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांचे नाव पुढे येवू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही झिरवाळ हे तिसºयांदा निवडून आले आहेत. तर कोकाटे हे पक्षाकडून पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. दुसरीकडे कोकाटे हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पवार यांच्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते. असे असले तरी, जिल्ह्यात अन्य पक्ष व आमदारांना मंत्रीपदी वर्णी लावायची असल्यास छगन भुजबळ यांचे मत मात्र निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक