शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरची नालेसफाई नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:21 IST

त्र्यंबकेश्वर : शहरात पावसाळापूर्व नालेसफाई नगरपालिकेने सुरू केली असली तरी ती वरवर केली गेल्याने प्रत्यक्ष पावसाळ्यात कोणत्या समस्येला सामोरे ...

त्र्यंबकेश्वर : शहरात पावसाळापूर्व नालेसफाई नगरपालिकेने सुरू केली असली तरी ती वरवर केली गेल्याने प्रत्यक्ष पावसाळ्यात कोणत्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे, या प्रश्नाने शहरवासीयांना घेरले आहे. दरम्यान, काही लोकप्रतिनिधींकडून स्वत: हजर राहून नालेसफाईवर भर दिला जात आहे.पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे प्रमाण जास्तच आहे. शहरात साधारणपणे जून महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळी नाले सफाईला सुरुवात होत असते. यंदाही नगरपालिकेने नालेसफाईचा ठेका देऊन कामाला सुरुवात केली असली तरी पावसाळा सुरू होऊन अद्यापही सफाईची कामे सुरूच आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वरवर नालेसफाई केल्याचे दिसून येत आहे. अजूनही गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर घाण-कचरा आहे. शहरात पावसाळी गटारी, नदीपात्राचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. याठिकाणी भाजीविक्रेत्यांकडून शिळा भाजीपाला पात्रात टाकून दिला जातो. याशिवाय शहरातील डेब्रिजही टाकले जाते. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर येऊन पाणी शहरात घुसते. नागरिकांनी नदीपात्रात घाण-कचरा टाकू नये यासाठी नगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जातात. परंतु नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, नालेसफाई विलंब होत असल्याने काही लोकप्रतिनिधी स्वत: हजर राहून कामगारांकडून नालेसफाई करून घेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक