शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निकालपत्रकावर वडिलांबरोबरच आईचेही नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 15:55 IST

फांगदर शाळेचा उपक्रम : विद्यार्थ्यांना आकर्षक संगणकीय प्रत

ठळक मुद्देशाळेने चालू वर्षी विद्यार्थ्यांना संगणकीय निकालाची प्रत देत महाराष्ट् दिनी विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीत वाटप केली.

दिनकर आहेर, खामखेडा : फांगदर, ता. देवळा येथील प्राथमिक शाळेने या वर्षी विद्यार्थ्यांना संगणकीय रंगीत निकालपत्रिका देत त्यावर वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नाव देखील समाविष्ट केले. शाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत करत कौतुक केले. असा अभिनव उपक्र म राबवणारी फांगदर शाळा जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.शिक्षण क्षेत्रात निकालपत्रकांना अनन्य साधारण महत्व असते. ह्या पदव्यांना प्रत्येक जण जीवापाड जपत असतो. त्याच पद्धतीने शालेय जीवनातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील निकालपत्रक देखील अनेक विद्यार्थी आपल्याकडे जपून ठेवत असतात. त्यामुळेच खामखेडा ता. देवळा येथील येथील फांगदर प्राथमिक शाळेने चालू वर्षी विद्यार्थ्यांना संगणकीय निकालाची प्रत देत महाराष्ट् दिनी विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीत वाटप केली. शाळेचे शिक्षक खंडु मोरे यांनी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आपल्या शालेय जीवनातील निकालपत्रक सांभाळता येईल यासाठी अतिशय आकर्षक पद्धतीने रंगीत निकालपत्रक तयार केले.वेगळेपणा आलानिकालाच्या सर्वच बाबी ह्या संगणकाच्या मदतीने तयार करण्याने शिक्षकाचे मुल्यमापन/रेकॉर्ड तयार करण्याला वर्षभरातला ऐंशी टक्क्याहून अधिक वेळ व श्रम वाचतो. निकाल पत्रकात सुटसुटीतपणा,अचूकता,एकसारखेपणा,वेगळेपणा आला.- संजय गुंजाळ, मुख्याध्यापक

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा