शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 14:42 IST

नाशिक : लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रूपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटींग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरूद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाब जबाब लिहून घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले ...

ठळक मुद्दे‘गायत्री मार्केटींग’च्या विरोधात पोलिस ठाण्यात धावगुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले : आयोजक फरारच

नाशिक : लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रूपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटींग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरूद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाब जबाब लिहून घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.दरमहा साडेचारशे ते सातशे रूपये गोळा करून महिन्यातून एकदा लकी ड्रॉद्वारे सभासदांना दुचाकी वाहन देणा-या या योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार नागरिकांनी भाग घेतला होता. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेच्या पंधरा महिन्यानंतर जमा होणा-या साडेनऊ हजार रूपयांच्या मोबदल्यात ‘गायत्री मार्केटींग’कंपनी प्रत्येक सभासदाला एलएडी दूरदर्शन संच देणार होता. ही योजना जून महिन्यात संपुष्टात येण्यापुर्वीच आयोजकांनी ठक्कर बजार बसस्थानकानजिक उघडलेले कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला त्यामुळे हवालदील झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी आयोजकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु आज देतो, उद्या देतो असे आश्वासन देणा-या आयोजकांनी अखेर सभासदांचे फोन उचलणेही बंद केले. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाश झोत टाकणारी वृत्तमाला प्रसिद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलीस आयुक्तांना फसवणूक झाल्याचे निवेदन दिले होते. आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिल्याने सोमवारी असंख्य गुंतवणूकदारांनी सकाळपासूनच सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला व ‘गायत्री मार्केटींग’च्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी पोलिसांनी गायत्री मार्केटींगच्या भरत पाटील या आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने आपण बाहेरगावी असल्याचे सांगितले. दूरदर्शन संच देणा-या कंपनीने आमची फसवणूक केल्यामुळे हा पश्न निर्माण झाला असून, लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिसांनी त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, काही गुंतवणूकदारांनी आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्याची तक्रार काही गुंतवणूकदारांनी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसात आयोजकांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस