शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

नामको : ‘प्रगती’ची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:30 IST

उत्तर महाराष्टतील सर्वांत मोठ्या आणि बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या दि नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये यापूर्वीच्या माजी सत्तारूढ प्रगती पॅनलची घोडदौड कायम आहे.

नाशिक : उत्तर महाराष्टतील सर्वांत मोठ्या आणि बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या दि नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये यापूर्वीच्या माजी सत्तारूढ प्रगती पॅनलची घोडदौड कायम आहे.  गुरुवारी (दि.२७) उर्वरित मतमोजणी  होणार असून, त्यात मात्र उलटफेर होण्याचा दावा प्रतिस्पर्धी पॅनलकडून केला जात  आहे.  पावणे दोन लाख मतदार असलेल्या या बॅँकेच्या निवडणुकीत आजवर (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सत्ता होती. त्याच संचालकांनी सोहनलाल भंडारी, वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली तर प्रतिस्पर्धी सहकारी पॅनलनेदेखील ललित मोदी, अजय ब्रह्मेचा व गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक लढत दिली. तथापि, त्या तुलनेत (कै.) हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र असलेल्या अजित बागमार यांना मात्र करिश्मा साधता आलेला नाही. अर्थात, सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांनी ६५६२ मते मिळवलीे.  रविवारी या बॅँकेसाठी झालेल्या निवडणुकीत ३६.२१ टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर सिडकोतील राजे संभाजी स्टेडिअममध्ये बुधवारी (दि.२६) मतमोजणीला प्रारंभ झाला.  या निवडणुकीत तीन फेºया पहिल्या दिवशी होणार होत्या. पैकी दुपारी तीन वाजता पहिली फेरी संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अधिकृतरीत्या पहिली फेरी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ यांनी घोषित केली. त्यानुसार सर्वसाधारण गटातील १८ पैकी १७ जागांवर प्रगती पॅनल आघाडीवर आहे. या शिवाय महिला आणि अनुसूचित राखीव गटातही तेच आघाडीवर आहेत.या फेरीत प्रगती पॅनलचे सोहनलाल मोहनलाल भंडारी (६,९९५), महेंद्र मूळचंद बुरड (५,८०१), शिवदास मोहनलाल डागा (६,९०५), प्रकाश मोतीलाल दायमा (६४०३), संतोष मांगीलाल धाडीवाल (५,६२६), हेमंत हरिभाऊ धात्रक (७,५८४), गणेश बबन गिते (५,९६९), वसंत निवृत्ती गिते (८,३९५), अविनाश मूळचंद गोठी (६५४४), कांतीलाल भागचंद जैन (६५८०), हरिष बाबुलाल लोढा (६५७४), सुभाष चंपालाल नहार (६३२७),नरेंद्र हिरामण पवार (७०६२), प्रफुल्ल बुधमल संचेती (६,९४४), विजय राजाराम साने (७२४४), अशोक श्रावण सोनजे (६१९९), रंजन पुंजाराम ठाकरे (६५१०) याप्रमाणे मते मिळाली आहेत.सहकार पॅनलचे किशोरकुमार सुवालाल बाफणा (४५१५), किसनलाल कन्हैयालाल बंब (३९६०), ईश्वरालाल धोंडीराम बोथरा (३९६९), अजयकुमार जव्हेरीलाल ब्रह्मेचा (४९७३), सुनील मोतीलाल बूब (४०५०), मधुकर भाऊराव हिंगमिरे (५५१५), सुनील रघुनाथ केदार (४५१५), भास्कर कृष्णा कोठावदे (५७३०), सचिन विनोद कोठावदे (४२८०), शरद नामदेव कुटे (४५३३), डॉ. शरदचंद्र निवृत्ती महाले (५२४६), संतोष चंदुलाल मंडलेचा (४९२७), ललितकुमार जवरीलाल मोदी (५४२७), नंदलाल सुंदरलाल पारख (४६५५), सुरेश अण्णाजी पाटील (५१४३), गजानन दामोदर शेलार (६५६२), अनंता देवराम सूर्यवंशी (४३०७), अशोक धोंडू व्यवहारे (४२५२) याप्रमाणे मते मिळाली आहेत.या फेरीअखेरीस नम्रता पॅनलचे दत्तात्रेय काळू अमृतकर (११४४), मुबीन हनीफ अन्सारी (१०४२), अजित हुकूमचंद बागमार (३११३), महेश देवबा भामरे (१२९०), अनिल दत्तात्रेय भोर (९९८), चंद्रभान बाबुराव बोरस्ते (१२९२), सुरेश लक्ष्मण दंडगव्हाळ (१०३३), नितीनकुमार धनराज ललवाणी (९०७), संजय मोतीलाल नावंदर (९६२), भास्कर दत्तात्रेय निकम (९३५), शिवाजी बाबुराव पालकर (१५१५), महेश बबन पठाडे (७३३), दिलीप मनोहर पवार (१२३०), संजय बबनराव सानप (११२४), श्रीकृष्ण भिला शिरोडे (१०४२), सचिन सुभाषचंद्र सूर्यवंशी (१०३०), श्रीधर वसंतराव व्यवहारे (१३५५), संदीप दलपत वालझाडे (१२२७) याप्रमाणे मते मिळाली.महिला गटात प्रगती पॅनलच्या रजनी जयप्रकाश जातेगावकर (८,३९८) आणि शोभा जयप्रकाश छाजेड (८,९१८) या दोघी आघाडीवर आहेत. अन्य उमेदवारांपैकी सहकार पॅनलच्या रेखा कैलास भुतडा (४,७२३) आणि सोनल संदीप मंडलेचा (४ हजार ६४२) तर नम्रता पॅनलच्या ज्योती राजेंद्र बागमार (२,४९३) आणि प्रज्ञा नंदू सावंत (१४००) याप्रमाणे मते मिळाली आहेत. यातील ज्योती बागमार या हुकूमचंद बागमार यांच्या स्नुषा आहेत. अपक्ष प्रतिभा सुधाकर जाधव (७२९) मते मिळाली.अनुसूचित जाती जमाती गटातील एकमेव जागेवर प्रगती पॅनलचे उमेदवार प्रशांत अशोक दिवे यांना ६,९२८ मते मिळाली. तर सहकारचे मनोहर त्रिभुवन (४,७५५) आणि नम्रता पॅनलचे हरिभाऊ लासुरे यांना ३६५२ याप्रमाणे मते मिळाली. याशिवाय चंद्रकांत आल्हाट (२३२), यशवंत निकुळे (२६०) मते मिळाली.

टॅग्स :Electionनिवडणूकbankबँक