शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा : नाशिकमधील कारविक्री करणाऱ्या दालनांच्या नावांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:43 IST

नोटिसांद्वारे खरेदी केलेली वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी कुठल्याही प्रकारे वाहनांची खरेदी न करता केवळ धनादेशाद्वारे रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देउगलेने भासविले स्वत:ला संचालक या प्रकरणामध्ये बॅँकेच्या कर्मचा-यांसह अधिका-यांवरही पोलिसांना संशय मोटार विक्री करणा-या दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालय

नाशिक : वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चन्ट्स को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नामको बॅँकेचे अंबड शाखेचे शाखाधिकारी उमाजी गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विवेक अरुण उगले (रा. पाथर्डीफाटा), सुनील रुंजा धोंगडे (रा. कुरेगाव), सोमनाथ गेणू गव्हाणे (रा. सावतानगर), भास्कर परशराम नरवाडे (रा. आंबेबहुला), संगीता पंढरीनाथ कोंबडे, सुरेश गंगाधर कोंबडे (दोघे रा. पाथर्डीफाटा) यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार के ली. विविध नामांकित कंपन्यांच्या शोरूमच्या नावाने कोटेशनही बॅँकेच्या शाखेत सादर केले. तसेच टाटा कंपनीचा ट्रक खरेदीसाठी वीस लाख ८५ हजार, फियाट पुंटो इमोशन या कार खरेदीसाठी आठ लाख पन्नास हजार रु पये, टाटा सफारी कार खरेदीसाठी अकरा लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश नामको बॅँकेकडून शहरातील विविध नामांकित चारचाकी विक्री करणाºया कंपन्यांच्या दालनांच्या नावाने घेऊन पाथर्डीफाटा येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद शाखेतून तब्बल ४१ लाख रुपये स्वत:च्या वैयक्तिक खात्यावरून काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संबंधित उगले याने स्वत:ला मोटार विक्री दालनाचा संचालक असल्याचे भासवले. दरम्यान, नामको बॅँकेकडे खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुजित मुंढे करीत आहेत.असा झाला उलगडा...संशयित कर्जदारांनी कर्ज रकमेचा मासिक हप्त्याच्या रकमेचा धनादेश आयसीआयसीआय बॅँकेचा नामकोच्या अंबड शाखेला दिला. हा धनादेश बॅँकेने संबंधित बॅँकेकडे पाठविला; मात्र धनादेश वठू शकला नाही व तो नामको बॅँकेकडे परत आला. या प्रकरणी नामको व्यवस्थापनाने संबंधितांना नोटीस बजावली. नोटिसांद्वारे खरेदी केलेली वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी कुठल्याही प्रकारे वाहनांची खरेदी न करता केवळ धनादेशाद्वारे रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.उगलेने भासविले स्वत:ला संचालकउगले याने स्ट्रर्लिंग मोटर्स, फ्युचर्स कार या नामांकित दालनाचे स्वत:ला संचालक (प्रोप्रायटर) भासवून नामको बॅँकेकडून विविध वाहन खरेदीसाठी घेतलेले धनादेश अनुक्रमे २० लाख ८५ हजार, ८ लाख ५० हजार, ११ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर धनादेश उगले याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने संगनमताने स्वत:च्या पाथर्डीफाटा येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबादच्या शाखेतून वठविले. यावेळी त्याने स्वत:ला वरील मोटार विक्रीच्या दालनाचा संचालक असल्याचे भासविले व परस्पर रक्कम काढून बॅँकेची फसवणूक केली. या प्रकरणामध्ये बॅँकेच्या कर्मचा-यांसह अधिका-यांवरही पोलिसांना संशय असून, त्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. उगले याने वरील मोटार विक्री करणा-या दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालयही उघडले होते, असे समजते.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकPoliceपोलिस