शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पावसाळ्याच्या तोंडावर दहा तालुक्यात टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 15:50 IST

नदी,नाले आटले तर विहीरींनी तळ गाठळ्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली.

ठळक मुद्देसध्या टँकर्स सुरू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये येवला आणि सुरगाण्यामध्ये सर्वाधिक टँकसे सुरू आहेत. ७२ गावे ५१ वाडे यांना एकुण ५६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

टंचाईच्या झळा: येवला, सुरगाण्यात सर्वाधिक टँकर्स सुरूनाशिक: मागील वर्षी मुबलक पाऊस होऊनही जिल्ह्यातील ७२ गावांना पाणी टंचाई जाणवत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सद्यस्थितीत दहा तालुक्यांमध्ये ५६ टँकर्सदवारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. शुक्रवारी बागलाणमध्ये एक टँकर सुरू करण्यात आला.       मागील मोसमात जिल्ह्यावर वरुणराजचीकृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे भरली होती. त्यामुळे नदी, नाले, विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढल्याने यंदा टचाईच्या झळा बसणार नाही अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु मे महिन्यातील पंधरवड्यानंतर विहीरींनी तळ गाठळ्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीव्र उन्हामुळे टंचाईत अधिक भर पडल्याने पाण्यासाठी वणवण सुरू झाली.नदी,नाले आटले तर विहीरींनी तळ गाठळ्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या टँकर्सच संख्येत ाय महिन्यात चार ने वाढली असून एकुण टँकर्सची संख्या ५६ इतकी झाली आहे.सध्या टँकर्स सुरू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये येवला आणि सुरगाण्यामध्ये सर्वाधिक टँकसे सुरू आहेत.   सुरगाण्यात १२ गावांमध्ये सध्या टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ आणि चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ८ याप्रमाणे टँकर्स सुरू आहेत.जिल्ह्यात सध्या बागलाण, चांदवड, देवळा,मालेगाव, नांदगाव,पेठ, सुरगाणा, त्र्यंबक,येवला या तालुक्यांमधील ७२ गावे ५१ वाडे यांना एकुण ५६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयwater transportजलवाहतूक