शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी ओबीसी संघटनांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 14:49 IST

रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच द्वारका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांची वाहने चारही बाजुंनी उभी करण्यात आली होती. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते चौकात दाखल झाल्यानंतर अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच कार्यकर्ते बसल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे निषेधाचे फलक देखील यावेळी झळकविण्यात आले. काळे कपडे परिधान करून काही कार्यकर्ते आंदोलनात सहभागी

ओबीसी आरक्षण: द्वारका चौकात आंदोलकांना घेतले ताब्यातनाशिक: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरविण्यात आल्यानंतर आक्रामक झालेल्या ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सकाळ पासून चौकात वाहतूक कोंडी झालेली असतांनाचआरक्षण बचावासाठी तीव्र घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटांनसह समता परिषदेने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार नाशिकमध्ये द्वारका चौकात ओबीसी संघटनांसह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण बचासाठी आक्रोश आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. ह्यनिषेधह्ण अशा आशयाचे काळे कपडे परिधान करून काही कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. निषेधाचे फलक देखील यावेळी झळकविण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा केलेले कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच द्वारका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीसांची वाहने चारही बाजुंनी उभी करण्यात आली होती. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते चौकात दाखल झाल्यानंतर अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरच कार्यकर्ते बसल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.आंदोलनात समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, संतोष डोमे, समाधान जेजूरकर, अंबादास खैरे, पांडुरंग काकड, कविता कर्डक, नगरसेवक समीना मेमन आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ