शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘मेरा रंग दे बसंती चोला’ने रंगली संगीत संध्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:26 AM

‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.

ठळक मुद्देगीतांची धून : वायुसेनेच्या बॅँड पथकाने जागविले देशभक्तीचे स्फुलिंग

नाशिक : ‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देवळाली येथील वायुसेना केंद्राच्या वतीने आयोजित भारतीय संरक्षण व स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजूषा आणि संगीत संध्या मैफलीचे. उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये शनिवारी (दि.११) झालेल्या या देशभक्तीपर कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवळाली केंद्राचे एअर कमांडर विशिष्ट सेवा मेडल रवि शर्मा यांच्यासह वायुदलाचे विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते.यावेळी पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायुदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर सिम्फोनी-४०, कॉर्नफ्लिड रॉक, भारतीय क्लासीकल राग बहार, जुबी डुबी, ये मेरा दिल (हिंदी मेलडी), सुनो गौर से दुनियावालों... अशा विविध गीतांची धून बॅन्ड पथकाच्या वादकांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मैफलीचा समारोप ‘वंदे मातरम्...’ च्या धूनने करण्यात आला. यावेळी ये देश हैं वीर जवानों का..., ऐ मेरे वतन के लोगो... या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. उपस्थित श्रोत्यांनी मैफलीच्या समारोपप्रसंगी ‘भारत माता की जय...’ अशी घोषणा देत देशभक्तीचा जागर केला.भारतीय वायुसेनेचा जगात चौथा क्रमांक लागतो. युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या वायुदलाच्या वतीने प्रथमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन अशा पद्धतीने देशक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम शहरात सादर करण्यात आला. सूत्रसंचालन सुजीतकुमार झा यांनी केले.प्रश्नमंजूषेचा उत्साहसंगीत मैफलीच्या प्रारंभी वायुदलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व सैन्यदलाशी संबंधित दहा ते पंधरा विविध सामान्यज्ञानावर आधारित वैकल्पिक प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना विचारण्यात आले. यावेळी बहुतांश नाशिककरांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी अचूक उत्तरे देणाºया प्रेक्षकांना वायुदलाच्या वतीने ‘कॅप’, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकindian air forceभारतीय हवाई दल