शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

़़़अन् माय^-लेकरांची शिवरेत झाली पुनर्भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:07 IST

निफाड : मनुष्य असो की प्राणी या दोन्ही घटकांमध्ये आई आणि लेकरू या नात्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. आपले लेकरू थोडेसे दृष्टीआड झाले की आई मग कोणतीही असो, ती कासावीसच होते. तेच लेकरू नजरेस पडते तेव्हा ती त्याला कुशीत घेते, मायेने कुरवाळते. माय-लेकराची होणारी भेट हा अवर्णनीय असा मेळ असतो. यास प्राणीजातही अपवाद नसते. बारा तासाहून अधिक काळ ताटातूट झालेल्या बिबट्याची मादी व दोन बछड्यांची भेट येवला वनविभागाच्या वनाधिकाºयांनी शनिवारी रात्री घडवून आणली.

ठळक मुद्देयेवला वनविभाग : ‘ती’ आली अन् १९ तासांनी बछड्यांना घेऊन गेली वनविभागाच्या या प्रयोगाचे नागरिकांनी कौतुक केले

निफाड : मनुष्य असो की प्राणी या दोन्ही घटकांमध्ये आई आणि लेकरू या नात्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. आपले लेकरू थोडेसे दृष्टीआड झाले की आई मग कोणतीही असो, ती कासावीसच होते. तेच लेकरू नजरेस पडते तेव्हा ती त्याला कुशीत घेते, मायेने कुरवाळते. माय-लेकराची होणारी भेट हा अवर्णनीय असा मेळ असतो. यास प्राणीजातही अपवाद नसते. बारा तासाहून अधिक काळ ताटातूट झालेल्या बिबट्याची मादी व दोन बछड्यांची भेट येवला वनविभागाच्या वनाधिकाºयांनी शनिवारी रात्री घडवून आणली.निफाड तालुक्यातील शिवरे येथील सुनील बाळासाहेब सानप यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना शनिवारी दुपारी १ वाजता दोन बछडे ऊसतोड कामगारांना दिसून आले. त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळविली. येवला वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी बछडे ताब्यात घेतले. दोन्ही बछडे एक महिन्याचे आहेत. येवला वनविभागाचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. एम. राठोड , आव्हाड, वनरक्षक विजय टेकनर, भैय्या शेख, रामनाथ भोरकडे, रामचंद्र गंडे आदींच्या पथकाने या बछड्यांच्या आईला पिंजºयात जेरबंद करण्यापेक्षा सानप यांच्या शेतात घटनास्थळी कॅरेटमध्ये दोन्ही बछडे ठेवून आईच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. बछडे तिच्या ताब्यात मिळाल्यास ती हिंसक होणार नाही हा उद्देश त्यामागे होता. त्यानुसार शनिवारी रात्री बछडे एका कॅरेटमध्ये ठेऊन त्यावर एक कॅरेट ठेवण्यात आले. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास बछडे ठेवलेल्या कॅरेटजवळ ती मादी आली. तिने आधी कॅरेटजवळ जाऊन वरील कॅरेट पाडले. तिचे वात्सल्य जागे झाले . मायेने बछड्यांना जवळ घेतले व काही वेळाने दोन्ही बछड्यांना घेऊन ती घटनास्थळावरून निघून गेली. ते दृश्य पाहून वनाधिकाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.निफाड तालुक्यात दुसरा प्रयोग यशस्वीअशा पद्धतीचा प्रयोग जुन्नर तालुक्यात वनविभाग राबवत आहे. हा जुन्नर फॉर्म्युला निफाड तालुक्यात दुसºयांदा यशस्वी झाला आहे. मागील वर्षी येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे अशाच पद्धतीने बछडे आईच्या ताब्यात दिले होते. वनविभागाच्या या प्रयोगाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.