शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘मुथूट’ दरोडा : टोळीतील चौथ्या दरोडेखोराला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:54 IST

सुभाष याने दरोडा टाकण्यापुर्वीच आपल्या कुटुंबाला शहरातून मुळ उत्तरप्रदेश राज्यातील गावी स्थलांतरीत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे१२ दरोडेखोरांच्या टोळीतील चौथा दरोडेखोर पोलिसांच्या हातीतीघे नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेतउंटवाडीसह विविध रस्त्यांची रेकी करण्यामध्येही सहभाग

नाशिक : मुथूट फायनान्स कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराधारासह त्याच्या तीघा साथीदारांना पोलिसांनी यापुर्वीच अटक केली. या टोळीला स्थानिक म्हणून सर्वोतोपरी मदत पुरविणारा सातपूरचा रहिवासी सुभाष गौड हा घटनेपासून फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते; मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगार देण्यास यशस्वी होत होता. अखेर तपासी पथकाने त्यास बेड्या ठोकल्या.सुभाष हा एजंट म्हणून सातपूर भागात वावरत होता. याने दरोडेखोरांच्या टोळीची राहण्यापासून सर्व व्यवस्था सातपूरमध्ये केल्याचे तपासात पुढे आले आहे. दरोडेखोरांना शहराच्या विविध रस्ते, परिसर, पोलिसांचे नाकाबंदी पॉइंट आदिंविषयीची सर्व माहिती पुरविण्यापासून तर त्यांच्यासोबत उंटवाडीसह विविध रस्त्यांची रेकी करण्यामध्येही त्याचा सक्रीय सहभाग असल्याचे पोलिसांनी यापुर्वीच सांगितले आहे. पोलीस जून महिन्यापासून त्याच्या मागावर होते. त्याच्या अटकेनंतर दरोड्याचा कट रचण्यापासूनची सर्व प्रकारची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे. त्यामुळे त्याला अटक करणे गरजेचे होते. दरोडेखोरांनी दरोड्यात पल्सर दुचाकींचा वापर करत शहरातून बाहेर पलायन करून ट्रकमधून थेट सुरत गाठले होते. सुभाष याने दरोडा टाकण्यापुर्वीच आपल्या कुटुंबाला शहरातून मुळ उत्तरप्रदेश राज्यातील गावी स्थलांतरीत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सशस्त्र दरोडा टाकत एका तरूणाला गोळ्या घालून ठार मारणा-या १२ दरोडेखोरांच्या टोळीतील चौथा दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला आहे. संशयित आकाशिसंग राजपूत त्याचा भाऊ जितेंद्रसिंग राजपूत आणि परमेंदरिसंग या तीघांना यापुर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हे तीघे नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीArrestअटक