शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

मुथूट गोळीबार : हेल्मेटसह आढळल्या शहराच्या वेशीवर दरोडेखोरांच्या ‘पल्सर-२२०’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 14:17 IST

रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशहराची कायदासुव्यवस्था कमालीची ढासळली हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली नाकाबंदीत सुमारे २० किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून कसे कापले?

नाशिक : उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात जबरी लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२०प्रकारच्या तीन दुचाकी शहराच्या वेशीवर रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी (दि.१५) पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दुचाकींच्या क्रमांकावरून या गुन्ह्याच्या तपासाला आता पोलीस गती देऊ शकणार आहे; मात्र तीनही पल्सरसोबत हेल्मेटदेखील पोलिसांना मिळून आल्याने हल्लेखोर शहराच्या नाकाबंदीमधून हेल्मेटसक्तीचा फायदा घेत वेशीबाहेर पोहचल्याचे बोलले जात आहे.शहराची कायदासुव्यवस्था मागील काही दिवसांपासून कमालीची ढासळली आहे. रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी गुंडांच्या गोळीबाराच्या घटनेने अवघे शहर हादरून गेले आणि पोलिसांची कायदासुव्यवस्था चव्हाट्यावर आली. या गुन्ह्यात फायनान्सचा निष्पाप तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेला. हल्लेखोरांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच गोळ्या त्याच्या शरीरात झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दिवसाच्या सुरुवातीला गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नाच्या घटनेने पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. शहराच्या कायदासुव्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे यावरून उघड झाले. विशेष म्हणजे गुरुवारच्या रात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन, मिशन आॅल आउट सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविले होते. तरीदेखील शुक्रवारी सशस्त्र दरोडा टाकण्याचा भरवस्तीत प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नाकेबंदी, झडतीसत्र, सीमाबंदीसाठी तपासणी नाके रात्रीची गस्त पथके ही केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.पोलिसांच्या ‘नाका’खालून ओलांडली वेसहल्लेखोरांनी क्षणार्धात पोलिसांच्या ‘नाका’खालून ते सहजरीत्या निसटले. हल्ल्याची माहिती मिळताच सर्व शहरात तसेच जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले गेले आणि नाकाबंदी वाढविली गेली. तपासपथके रवाना झाली; मात्र हाती काहीही लागले नाही. हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली आणि रामशेजजवळ गुन्ह्यात वापरलेल्या दुचाक्या सोडून पोबारा केला. यावरून पोलिसांच्या नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण नाकाबंदी असतानाही उंटवाडी ते रामशेजपर्यंत सुमारे २० किलोमीटरचे अंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून कसे कापले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Firingगोळीबारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडाbikeबाईक