शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही अफवा, आमीषाला बळी न पडता मुस्लीमांनी मतदान करावे : शहर-ए-खतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 15:17 IST

निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला

ठळक मुद्देअफवांवर मुस्लीम समाजाने लक्ष देऊ नयेस्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजवावामतदान हा प्रत्येकाचा अधिकार

नाशिक : भारतीय नागरिक म्हणून मतदान करणे हे प्रत्येक मुस्लीमाचे कर्तव्य आहे. भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येक प्रौढ मुस्लीम नागरिकाने सद्सद्विवेकबुध्दीने बजवावा. निवडणूकीदरम्यान पसरविल्या जाणाऱ्या कुठल्याही अफवा किंवा आमीषाला बळी पडू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाचे प्रमुख नेते व धर्मगुरू अलहाज हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला किंवा आमच्याकडून तशी त्यांना हमी दिली गेली; परंतू काही चुकीच्या पध्दतीने पसरविल्या जाणा-या बातम्यांच्या स्वरूपातील अफवांवर मुस्लीम समाजाने लक्ष देऊ नये.मतदान हा प्रत्येकाचा अधिकार असून त्याची गोपनियता बाळगणे हे कर्तव्य आहे. आपल्या बुध्दीने व खुल्या मनाने विचार करून प्रत्येक मुस्लीम प्रौढ मतदाराने मतदानाचा निर्णय घ्यावा व येत्या सोमवारी (दि.२९) मतदान केंद्रांवर अवश्य हजेरी लावून स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजवावा. जेणेकरून आपला भारत व देशाची लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होईल, असे खतीब यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. त्यांनी मुस्लीम समाजाला मतदानासोबत कुठल्याहीप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका असेही आवाहन केले आहे. प्रसिध्दीपत्रकावर मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ नेते सय्यद मीर मुख्तार अशरफी, हाजी वसीम पिरजादा यांच्याही स्वाक्षºया आहेत.--आयुष्यभर समाजाचे सेवक म्हणून मी कार्य करत आलो. समाजाने कुठल्याहीप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये, मतदान करणे हा आपल्या वैयक्तिक अधिकार आहे. तो आवर्जून बजवावा. खुल्या मनाने स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत कुठल्याही आमीषाला बळी न पडता निर्धास्तपणे मतदानासाठी येत्या सोमवारी सकाळी बाहेर पडावे.- मीर मुख्तार अशरफी, पदाधिकारी ईदगाह समिती

टॅग्स :NashikनाशिकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीमVotingमतदान