शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : जेलरोडवरून एकलहरा गंगावाडीला जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी युवकाच्या कुºहाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय जवळील भैरवनाथ नगर येथे राहाणारा संदीप वसंत मरसाळे (२९) याचा निर्घृण खून झाल्याचे तपासात निष्पण झाले. संदीप याचे ...

ठळक मुद्दे एकलहरा गंगावाडी रस्त्यावरील घटना पोलिसांनी संशयित दिपक याला घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : जेलरोडवरून एकलहरा गंगावाडीला जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी युवकाच्या कुºहाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय जवळील भैरवनाथ नगर येथे राहाणारा संदीप वसंत मरसाळे (२९) याचा निर्घृण खून झाल्याचे तपासात निष्पण झाले. संदीप याचे अनैतिक संबध असल्याचा संशयावरून दिपक भगवान पगारे (३५) याने खून केल्याचे समोर आल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप व दिपक यांच्यात सतत वादविवाद व कुरबुरी होत होत्या. मयत संदीप याचे आई-वडिल मंगळवारी रात्री घराच्या परिसरातच शतपावली करीत असतांना दिपक त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर दुपारी दीड-पावणे दोनच्या सुमारास संशयित दिपक याने संदीप याला फोन करून झालेला वाद मिटवुन घेऊ असे सांगुन एकलहरा गंगावाडी रोडवरील उज्वला मंगल कार्यालयाजवळ बोलवले.काही वेळातच संदीप हा मित्र अक्षय माधव बानाईत रा. भैरवनाथ नगर यांच्यासोबत मोटार सायकलवर (एमएच १५ डीएक्स १३०९) बसुन दिपला भेटावयास गेला. अगोदर पासूनच तयारीत असलेल्या दिपक याने संदीप समोर येताच त्याच्या डोक्यात कुºहाडीने सपासप तीन-चार वार केल्याने संदीप जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर संशयित दिपक पगारे याने पलायन केले.रस्त्यावरून येणाºया-जाणाºयांनी सदर घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेतली.तोपर्यंत घटनास्थळी गर्दी जमा झाली होती. पोलिसांना मयत संदीप यांची ओळख पटताच हा खुन अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याचे लक्षात आले. काही वेळातच पोलिसांनी संशयित दिपक याला ताब्यात घेतले. मयत संदीप हा जेलरोड दसक येथील ओमसाई मोटार ड्रायव्हींग स्कूलमध्ये गाडी शिकविण्याचे काम करीत होता. तर संशयित दिपक हा वाहन चालक म्हणून काम करीत आहे. याप्रकरणी अक्षय बानाईत याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दिपक पगारे याच्याविरूद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हा