नाशिकरोड : परिसरातील देवळाली दर्गा जवळील खोडदे चौक येथे अज्ञात पाच ते सहा संशयीतांनी केलेल्या हल्ल्यात बावीसवर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. संशयीतांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव योगेश पन्नालाल चायल रा. गाडेकरमळा देवळाली असे आहे. त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले. रात्री उशीरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
देवळाली गावात युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 01:12 IST