शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून हत्या : सटाण्यातील खुनाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:18 IST

मयत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता.

ठळक मुद्दे राजीव सरदार यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून

सटाणा : शहरासह बागलाण तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला असून याप्रकरणी  प्रेयसी व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. हर्षदा अरुण सोनवणे (वय 26 रा. चौगाव रोड, सटाणा) व रवि सुरेश खलाले (वय 36 रा.मंगल नगर, सटाणा) असे प्रेयसी व प्रियकराचे नाव आहे.

 सटाणा पोलिसांनी आरोपी हर्षदा सोनवणे हिला सटाणा शहरातून तर प्रियकर आरोपी रवी खलाले याला धुळे येथून अटक करण्यात आल्याची माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल 14 मे रोजी सकाळी सात वाजता दोधेश्वर घाटात इंडिगो मांझा कारमध्ये एक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. ही कार सटाणा शहरातील सम्राट म्युझिकलचे संचालक राजू सरदार यांची असल्याची खात्री होताच सटाणा पोलिसांनी राजू सरदार यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देत घटनास्थळावर पाचारण केले होते. मयत राजू सरदार यांच्या शरीरावरील जखमा आणि इतर परिस्थिती पाहता त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.  राजू सरदार यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सटाणा पोलिसांनी 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळावर अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी भेट देत पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली होती.

मयत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता. सायबर पोलिसांनी मोबाईल बंद होण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात कोण आले याचा सखोल अभ्यास करून शेवटी आलेल्या कॉलची तपासणी केली असता सटाणा शहरातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हा फोन असल्याची खात्री सटाणा पोलिसांना झाली. या अल्पवयीन विद्यार्थ्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या विद्यार्थ्यांची मामी हर्षदा अरुण सोनवणे (वय 26) ही माझा मोबाईल रात्री साडे दहा वाजल्यापासून ताब्यात घेऊन घराबाहेर गेल्याची माहिती त्याने पोलिसांना देत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माझा मोबाईल घरी घेऊन आल्याची माहिती या अल्पवयीन विद्यार्थ्याने पोलिसांना दिल्याने पोलिसांनी हर्षदा सोनवणे तिला ताब्यात घेतले.

 आरोपी हर्षदा सोनवणे हिच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सन 2013 पासून तिचे रवि सुरेश खलाले (रा.मंगल नगर,सटाणा.व्यवसाय टुरिस्ट कार चालक) याच्याशी प्रेम संबंध असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. गत अडीच महिन्यांपासून मयत राजू सरदार हा मला सतत फोन करून त्रास देत असल्याची तक्रार प्रियकर रवी खलालेकडे करून दोघांनी संगनमताने याचा खून केल्याची कबुली हर्षदा सोनवणे हिने पोलिसांना दिली.

...असा केला खून

प्रियकर रवी खलाले व प्रेयसी हर्षदा सोनवणे  या दोघांनी राजू सरदार यांच्या खुनाचा कट रचला. 13 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हर्षदा सोनवणे हिने राजू सरदार यांना फोन करून नामपुर रोडच्या बागलाण अकॅडमी जवळ बोलवले. राजू सरदार त्यांच्या इंडिगो मांझा कारने बागलाण अकॅडमी जवळ पोहोचले असता हर्षदा सोनवणे त्यांच्या कारमध्ये पुढील शिकवून बसली. तेथेच प्रियकर रवि अंधारात लोखंडी टॉमीसह दबा धरून उभा होता. हर्षदा हिने राजू सरदार यांना कार दोधेश्वर-कोळीपाडा रोड कडे घ्यायला लावली. कोळीपाडा रोडवर कार आली असता हर्षदा हिने कार उभी करायला लावली. कार उभी करून आरोपी हर्षदा सोनवणे व राजू सरदार बाहेर येताच मागून पल्सर वर आलेल्या रवी खलाले याने  लोखंडी टॉमीच्या साह्याने राजीव सरदार यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर दोघांनी राजू सरदार यांना मृत अवस्थेत उचलून त्यांच्याच कारमधील मागील सीटवर त्यांचा मृतदेह ठेवला.

टॅग्स :NashikनाशिकMurderखूनCrime Newsगुन्हेगारी