शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी भांडण सोडविण्यावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:56 IST

घराशेजारी होणारे भांडण सोडविण्यासाठी आल्याच्या रागातून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना गवळीवाडा भागात घडली. याप्रकरणी मयताची पत्नी रूकसाना निकहत ताहीर हुसेन अख्तर हिने शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी शेख रफीक शेख इस्माईल ऊर्फ राजा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मालेगाव : घराशेजारी होणारे भांडण सोडविण्यासाठी आल्याच्या रागातून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना गवळीवाडा भागात घडली. याप्रकरणी मयताची पत्नी रूकसाना निकहत ताहीर हुसेन अख्तर हिने शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी शेख रफीक शेख इस्माईल ऊर्फ राजा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील गवळीवाडा भागात शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी रुकसाना निकहत ही पती ताहीर हुसेनशी बोलत असताना शेजारी राहणारा शेख रफीक शेख इस्माईल ऊर्फ राजा हा त्याची मुलगी सना हिला मारहाण करीत करीत असल्याने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. म्हणून पतीसह रुकसाना घराबाहेर आले. ताहीर हुसेन अख्तर शमसुजमा (४१) हे संशयित आरोपी रफीक शेख याच्याकडे पाहता असताना भांडण सोडविण्यासाठी आल्याचा त्यास संशय आला. तो म्हणाला तू आमच्या भांडणात पडू नको तेव्हा मयत ताहीर हुसेन यांनी त्यास सांगितले की, तुझ्या भांडण्याचा आणि आरडाओरडीचा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. असे सांगण्याचा राग आल्याने रफीक ताहीर हुसेनच्या अंगावर धावून आला आणि शिविगाळ करू लागला. त्यामुळे गल्लीतील शायदा निहाल अहमद आणि शबाना माजीद अख्तर तेथे आल्या. त्यांनी शिविगाळ करू नको म्हणून आरोपी रफीक शेख यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने संशयित आरोपी रफीक शेख याने कमरेला लावलेला चाकू काढून ताहीर हुसेन अख्तर याच्या पोटात खूपसला. पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रुकसाना निकहत सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्या तोंडावर मारून धक्का देत पळून गेला. गल्लीतील जावीद अख्तर मेहमूद अहमद आणि अन्सारी नासिर अहमद यांनी ताहीर हुसेनला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शहर पोलिसांनी संशयित शेख रफीक शेख इस्माईल उर्फ राजा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बजरंगवाडी येथे एकास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दम देण्यात आला. या घटनेतील संशयिताना अटक करण्यापूर्वी २४ तासात अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका यंत्रमाग मजुराची हत्या झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून