इगतपुरीत आपसातील वादातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:17 AM2020-03-21T11:17:03+5:302020-03-21T11:17:13+5:30

इगतपुरी : शहरातील सिद्धार्थ नगर येथे रहाणारा युवराज करटुले याचा तृतिय पंथीयांचे हप्ता वसुलीच्या भांडणात खून करण्यात आला.

 The murder of one by one another at Igatpuri | इगतपुरीत आपसातील वादातून एकाचा खून

इगतपुरीत आपसातील वादातून एकाचा खून

googlenewsNext

इगतपुरी : शहरातील सिद्धार्थ नगर येथे रहाणारा युवराज करटुले याचा तृतिय पंथीयांचे हप्ता वसुलीच्या भांडणात खून करण्यात आला. मात्र मृत्यूपूर्वी पोलिसांना मयताने आरोपीबाबत माहिती दिल्याने तिघा संशयितांना पकडण्यात आले आहे.
शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी युवराज चेंडू करटुले (३०) याला तृतीय पंथीयांचे हप्ते वसुली करण्याच्या कारणाने धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले. त्याला नाशिक येथे उपचारासाठी नेले असताना त्याचा मृत्यू झाला. मात्र जखमी अवस्थेत करटुले याने पोलीसांना आरोपीची नावे व माहिती सांगीतल्यामुळे तिघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . गोपीचंद भंडारी, तावडी गोपीचंद भंडारी, भुषण माळी ,रा. नांदगाव सदो
या तिघांना पोलीसांनी जेरबंद केले असुन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहा . पोलीस निरिक्षक अमोल खोंडे यांनी दिली .
या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा . पो . नि . अमोल खोंडे , पोलीस हवालदार मारूति बोराडे, सचिन देसले, गणेश वराडे, विनोद गोसावी, वैभव वाणी आदि तपास करीत आहे .

Web Title:  The murder of one by one another at Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक