चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:22 AM2021-04-19T01:22:50+5:302021-04-19T01:23:57+5:30

चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी  धारदार शस्त्राने  आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी  मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे तर शोएब उर्फ सोनू हा फरार झाला  असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Murder of one in Malegaon over stolen money dispute | चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून

चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून

Next
ठळक मुद्देदोन संशयित ताब्यात, एक जण फरार

मालेगाव :  चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी  धारदार शस्त्राने  आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी  मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे तर शोएब उर्फ सोनू हा फरार झाला  असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 
काल शनिवारी (दि. १७) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास  म्हाळदे शिवारात गुलाब बाबा दर्गाजवळ २० ते २२ वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. याबाबत पवारवाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आणि उपअधीक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक एन. आर. शेख, हवालदार सुरेश बाविस्कर, सचिन धारणकर, भरत गांगुर्डे, सचिन भामरे, नवनाथ शेलार, राकेश जधव, सोमनाथ डामसे  यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. हे  अनोळखी प्रेत नूर मोहमद रौश मोहमद याचे असल्याचे निष्पन्न झाले. नूर मोहमदच्या मृत्यूबाबत संशय आल्याने दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीच्या पैशांच्या वादातून तिघांनी नूर मोहमद या मित्राचा खून केल्याचे सांगितले.

Web Title: Murder of one in Malegaon over stolen money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.