शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शेतीच्या वादातून एकाचा खून; बापलेकाविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:01 IST

सटाणा : शेतीच्या सामायिक बांधावर बैल चारण्यावरून कुरापत काढून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात फावड्याने हल्ला करून खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिपंळदर येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते फरार आहेत.

ठळक मुद्देपिंपळदर येथील घटना : संशयित फरार

सटाणा : शेतीच्या सामायिक बांधावर बैल चारण्यावरून कुरापत काढून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात फावड्याने हल्ला करून खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिपंळदर येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते फरार आहेत.शनिवारी पिंपळदर येथील संजय नामदेव पवार (४६) हे त्यांच्या शेतीच्या बांधावर बैल चारण्यासाठी खुंटी ठोकत असताना सामायिक बांधावरील गवत पाहून संशयित विक्रम दोधा पवार व त्यांच्या पत्नी पमाबाई पवार यांनी हे गवत सामायिक बांधावर टाकू नका. त्यामुळे जमीन खराब होते अशी कुरापत काढून विक्रम व त्यांचा मुलगा विश्वनाथ पवार यांनी संजय पवार यांच्यावर लोखंडी फावडे व पाईपने पाठीवर, डोक्यावर हल्ला केला. संजय पवार यांच्या डोक्याला वर्मी घाव लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी शहरातील डॉ. जगताप यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अति रक्तस्राव झाल्याने ते कोमात गेले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी दुपारी एक वाजता उपचारादरम्यान संजय यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात विक्रम व विश्वनाथ पवार या बापलेकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून