शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फुलेनगर : चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेचा पतीने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 16:31 IST

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असून तिचे गावाकडे असलेल्या मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याने रागाच्या भरात...

ठळक मुद्देगळा आवळून तोंडावर दगडी पाटा मारला

नाशिक : पंधरवड्यापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून तसेच तोंडावर दगडी पाटा मारून खून केल्याची घटना शनिवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास फुलेनगरातील मुंजोबा गल्लीत घडली . घटनेनंतर संशयित आरोपी पती सागर पारधीने स्वतः पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.या घटनेत आरती सागर पारधी (१८) हिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी पती सागर गणपत पारधी याला अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरवड्यापूर्वी सागर आणि आरतीचा विवाह झाला होता. विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू झाले. काल शनिवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यातून संशयित सागरने पत्नीला शिवीगाळ करत सुरुवातीला तिचा गळा आवळला व त्यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा टाकला तोंडावर वर्मी घाव बसल्याने आरती जोराने ओरडली. त्यावेळी संशयिताच्या आईने तत्काळ वरच्या खोलीत धाव घेतली असता त्यांची सून आरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्यानंतर मुलगा सागरला विचारणा केली असता त्याने आरती शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असून तिचे गावाकडे असलेल्या मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याने रागाच्या भरात "मी तिचा गळा आवळला व तिच्या तोंडावर दगडी पाटा मारला"असे सांगितले.सदर घटनेनंतर जखमी आरतीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सकाळी संशयित आरोपी पती सागरने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसही काही काळ चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवून खात्री केली असता घटनास्थळी दगडी पाटा आढळून आल्याने संशयिताने खून केल्याचे उघडकीस आले.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनArrestअटक