शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

१७ एप्रिल २०१६ची काळरात्र : कू्ररपणे केली मायलेकाची हत्या; सातपूरमध्ये पुन्हा चर्चा ‘त्या’ निर्दयी घटनेचा ‘फ्लॅशबॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:01 IST

नाशिक : एखादा व्यक्ती गुन्हा करताना कुठल्या थराला जाऊ शकतो व आपण माणूस आहोत, हेदेखील तो विसरतो. एखाद्या माथेफिरूप्रमाणे तो कृत्य करू शकतो रामदास शिंदे हादेखील याला अपवाद राहिला नाही.

ठळक मुद्दे हैवानाला समाजात जिवंत राहण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद निर्दयीपणे अशाप्रकारे दुर्मीळातील दुर्मीळ खुनाची घटना

नाशिक : एखादा व्यक्ती गुन्हा करताना कुठल्या थराला जाऊ शकतो व आपण माणूस आहोत, हेदेखील तो विसरतो. एखाद्या माथेफिरूप्रमाणे तो कृत्य करू शकतो रामदास शिंदे हादेखील याला अपवाद राहिला नाही. पल्लवी संसारे या विवाहितेवर एक दोन नव्हे तर तब्बल २८ वार त्याने केले. एवढ्यावरही रामदास थांबला नाही तर त्याने चिमुकल्या विशालच्या शरीरावरही चाकूने २४ वार करून ठार मारल्याचे तपासात सिद्ध झाले असून, निर्दयीपणे अशाप्रकारे दुर्मीळातील दुर्मीळ खुनाची घटना असल्याने अशा हैवानाला समाजात जिवंत राहण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे न्यायालयापुढे करण्यात आला. अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास रामदास हा त्याच्या घरातील भाडेकरू संसारे यांच्या खोलीत गेला होता. यावेळी पल्लवी यांनी त्यास विरोध करत प्रतिकार केला असता त्याने वासना पूर्ण करण्याच्या भरात बळजबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पल्लवी यांच्याकडून विरोध होत असल्याचे बघून संतप्त रामदास याने जवळील चाकूने पल्लवी यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या शरीराच्या संवेदनशील भागावरही त्याने चाकूने वार क रत ठार मारले. तब्बल २४ वार केल्याच्या खुणा पोलीस पंचनाम्यातून पुढे आल्या. एवढेच नव्हे तर त्याने विशालच्या शरीराचीही अशाच क्रूरपणे अवस्था करून २८ वार करत त्याचा खून केला. गुन्ह्यात वापरलेला चाकू तपासी यंत्रणेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवून मयतांच्या अंगावरील वाराच्या जखमा अशाच पद्धतीच्या चाकूने होऊ शकतात का याची पडताळणी करण्यात आली, त्यांचा अभिप्रायदेखील सकारात्मक आला. या दुहेरी हत्याकांडाने १७ एप्रिल २०१६ साली शहरासह राज्य हादरले होते. ध्वनिफितीचा तांत्रिक पुरावातत्कालीन सहायक उपनिरिक्षक जगन्नाथ गायकवाड यांनी कसोशीने तपास करीत संशयित रामदास यास तत्काळ ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात १५ जून २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप व कु्ररता लक्षात घेत दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याचे सांगितले. न्यायालयाने उपलब्ध तांत्रिक परिस्थितीजन्य पुरावे आणि न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी महेश गांगुर्डे यांनी दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी साक्ष देताना सांगितलेल्या तांत्रिक बाजू व रामदास याने गुन्ह्यानंतर सीबीएस येथे येऊन मित्रासोबत साधलेला संवादाची ध्वनिफित त्याची पडताळणी व रामदासच्या आवाज तपासून पाहिला असता न्यायालयापुढे हा तांत्रिक पुरावा सिद्ध केला. गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध नाही. अतिरिक्त न्यायिक कबुली व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे खटला चालविला जात असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष होते. या खटल्यात ई-पुराव्यांची सिद्धता, परिस्थितीजन्य पुरावे आणि न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी व वैद्यकीय अधिकाºयांसह प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाºयांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यात आला आणि न्यायालयाने दुर्मिळातील दुर्मिळ घटना म्हणून याकडे बघितले आणि आरोपी रामदास यास फाशीची शिक्षा सुनावली. एकूणच परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही योग्य तपास केला तर खुनाच्या गुन्ह्यात फाशी होऊ शकते, असे या निकलावरून पुढे आले. एकूणच हा निकाल पथदर्शक ठरणारा आहे. रामदासने चाकूने विवाहिता व तिच्या मुलाची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह असलेल्या खोलीला कुलूप लावून किल्ली खिशात घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी स्पॉट पंचनाम्यामध्ये खोलीचे कुलूप जप्त केले व आरोपी रामदासला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून कुलूपाची किल्ली व गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला होता. न्यायालयासमोर सरकार पक्षाकडून खोलीच्या कुलूपाची किल्ली रामदासकडे होती, हे सिद्ध करण्यासाठी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.