शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात शेतमजुराचा डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 23:26 IST

सटाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावरील कंधाणा फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली आहे. घमाजी रंगनाथ माळी (वय ४०), रा. पिंगळवाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

सटाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावरील कंधाणा फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली आहे. घमाजी रंगनाथ माळी (वय ४०), रा. पिंगळवाडे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोरेनगर शिवारातील शेतकरी सुदर्शन सोनवणे यांच्या शेतात शेत मजूर म्हणून काम करीत असलेला घमाजी रंगनाथ माळी हा शनिवारी (दि.३) बाजार करण्यासाठी घराबाहेर गेला असता रात्री उशीर झाला तरी पती न आल्यामुळे पत्नीने त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही.रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंधाणा फाट्याजवळील हॉटेल गुरुप्रसादच्या पाठीमागे मोकळ्या जागेत घमाजी माळी याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून अतिशय निर्घृणपणे त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवलदार हेमंत कदम, जिजाभाऊ पवार, अजय महाजन, भास्कर बस्ते, प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी धाव घेत तपासी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले.पोलिसांकडून तपास सुरूमयत घमाजी माळी हा शनिवारी रात्री कोणासोबत होता, काही वादातून अथवा पूर्व वैमनस्यातून त्याला मारण्यात आले. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याला मारल्यानंतर दगडाने चेहेरा ठेचला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत. सटाणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून सायंकाळी घमाजी माळी याच्यावर पिंगळवाडे, ता. बागलाण येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी