शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’मुळे विषयांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:23 IST

स्थायी समिती : पहिल्या बैठकीत सदस्यांनी दिला केवळ अवलोकनावर भर

ठळक मुद्देस्थायी समितीवर विषय असो अथवा नसो, दर गुरुवारी सभा घेण्यात येणार असल्याचे सभापतींनी जाहीर केलेआयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारात असलेले विषय स्थायी समितीवर केवळ अवलोकनार्थ ठेवण्यात येतात.त्याला मंजुर-नामंजूर करण्याचा अधिकार स्थायीला नसतो

नाशिक - आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारून दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी त्यांनी अवलंबविलेल्या ‘त्रिसूत्री’मुळे बुधवारी (दि.२८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकही प्रस्ताव विषय पत्रिकेवर येऊ शकला नाही. त्यामुळे, सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंदाजपत्रकीय सभा वगळता झालेल्या पहिल्याच बैठकीत प्रशासनाकडून अवलोकनार्थ (केवळ माहितीस्तव) ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवरच चर्चा करण्यात सदस्यांनी धन्यता मानली. दरम्यान, यापुढे स्थायी समितीवर विषय असो अथवा नसो, दर गुरुवारी सभा घेण्यात येणार असल्याचे सभापतींनी जाहीर केले आणि सभेला वेळेवर हजर राहण्याची तंबीही अधिकारीवर्गाला दिली.स्थायी समितीत शिवसेनेचे दोन आणि मनसेचा सहयोगी सदस्य वगळता सभापतीसह अन्य सर्व सदस्य नव्याने नियुक्त झालेले आहेत. सभापतीपदी भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके या आरुढ झाल्यानंतर अंदाजपत्रकीय सभा वगळता झालेल्या पहिल्याच बैठकीला विषय पत्रिकेवर एकही प्रस्ताव नव्हता. त्यामुळे, प्रशासनाकडून विषय पत्रिकेवर केवळ सदस्यांच्या माहितीसाठी अवलोकनार्थ ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा घडवून आणण्यात आली. आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारात असलेले विषय स्थायी समितीवर केवळ अवलोकनार्थ ठेवण्यात येतात.त्याला मंजुर-नामंजूर करण्याचा अधिकार स्थायीला नसतो. बैठकीत, प्रामुख्याने, फाळके स्मारकातील दुरुस्तीसंबंधी झालेल्या कार्योत्तर खर्चाची माहिती ठेवण्यात आली. त्यावर, ठेक्याची मुदत संपली असेल तर मुदतीत निविदा प्रक्रिया का राबविली गेली नाही, असा सवाल उद्धव निमसे यांनी उपस्थित केला. मात्र, संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यावर नुसतीच चर्चा झाली. त्यानंतर, छपाईसाठी वार्षिक इ-निविदा दर मंजूर करण्याचा प्रस्ताव आला असता, त्यावर दिनकर पाटील यांनी आक्षेप घेत गेल्या दहा वर्षांपासून त्याच-त्या ठेकेदारांना कामे दिली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्धव निमसे यांनी दरपत्रकातील अटी-शर्तीत सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली. मुशीर सैय्यद यांनीही दरपत्रकाबाबत आक्षेप घेतला. त्यामुळे सभापतींनी पुढील सभेत दरपत्रकासंबंधीची सविस्तर माहिती सभेत ठेवण्याचे आदेशित केले. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या धोरणांबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचविलीच जात नसल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला.नगररचना विभागाच्या कारभारावर बोट ठेवत त्यांनी सरकारी मोजणी नकाशा हा नगररचना विभागानेच तयार केला पाहिजे, असे स्पष्ट केले. मात्र, नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागूल यांनी प्रत्येक प्रकरण वेगवेगळे असल्याने जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी नकाशा आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी, आयुक्त मुंढे यांच्या नावाने अधिकारीवर्ग नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याचाही आरोप निमसे यांनी केला. यावेळी, सभापतींनी शासनाच्या या धोरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अंदाजपत्रकीय सभेचे कार्यवृत्त दुरुस्तीसह मंजूर करण्यात आले. यावेळी, प्रवीण तिदमे यांनी अंदाजपत्रकातील त्रुटी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे