शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आमदारांच्या निधीबाबत आयुक्त मुंढे ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:55 IST

शहरातील आमदार त्रयींचा प्रत्येकी दहा कोटी निधी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासनाचाच याबाबत निर्णय असून त्यानुसार ही कामे केली जात असल्याचे सांगितले.

नाशिक : शहरातील आमदार त्रयींचा प्रत्येकी दहा कोटी निधी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासनाचाच याबाबत निर्णय असून त्यानुसार ही कामे केली जात असल्याचे सांगितले.  आमदार निधीतील अनेक कामे महापालिकेमार्फत केली जात असतात. राज्य सरकारने शहरातील तीन आमदारांना प्रत्येकी दहा कोटी रुपये याप्रमाणे तीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यावर त्यांनी नाट्यगृह आणि तरण तलावासह अनेक प्रकल्प सुचविले असले तरी आयुक्तांनी ही रक्कम शहरातील विविध भागांत जलवाहिन्या टाकून शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपयोग करण्याचे ठरविले आहे. त्यावर काही आमदारांची नाराजी असून त्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांना शनिवारी (दि. २१) पत्रकारांनी विचारले असताना आमदारांच्या विशेष निधीतून कोणती कामे करावी यासाठी शासनाचा निर्णय असून, त्या आधारेच हा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहरात पाणीपुरवठ्याची समस्या असून, अनेक भागांत पाणीपुरवठा होत नाही. अपुºया जलवाहिनींचे जाळे ही समस्या असून, त्यामुळेच हा निधी पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, असे सांगितले. आमदार निधीतील कामे ज्या क्षेत्रात केली जातात, त्या प्राधीकरणाचा ना हरकत दाखल आवश्यक असतो कारण शेवटी बांधकाम खाते किंवा महापालिकेला सदर मिळकतीची देखभाल दुरुस्ती करावी लागत असते असे सांगून भविष्यात अशाप्रकारची आमदार निधीतील कामे होत असताना त्यांना ना हरकत दाखला द्यावा किंवा नाही याबाबत विचाराअंती निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.अंगणवाड्या नियमानुसारच बंदशहरात सध्या गाजत असलेल्या अंगणवाडी बंदच्या मुद्यावर बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेने १० डिसेंबर १९९३ मध्ये पंचवीस अंगणवाड्या सुरू करताना धोरण ठरविले होते. त्यानुसार चाळीस ही पटसंख्या मान्य करतानाच आयसीडीएसच्या क्षेत्रात अंगणवाडी सुरू केल्या जाणार नाहीत आणि या कर्मचाºयांना सेवेसाठी दावा करता येणार नाही, असे निकष ठरविले होते. शासनाच्या नव्या निर्णयामुळे या अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ४० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या १२० तर २५ ते चाळीस पटसंख्या असलेल्या १४२ आणि ० ते २५ पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या आढळल्या. यातील ५३ अंगणवाड्या आयसीडीएसकडे विलीन करण्यात आल्या. उर्वरित ४० अंगणवाड्या बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका