शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची कारवाई, नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:36 IST

महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताना अनेक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. तथापि, अनेक सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांमुळे हा प्रकार घडत असताना दुसरीकडे मात्र प्रामाणिक करदात्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे.

नाशिक : महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताना अनेक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. तथापि, अनेक सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांमुळे हा प्रकार घडत असताना दुसरीकडे मात्र प्रामाणिक करदात्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. त्यांना नियमित शुल्क व कर भरूनही पाणी मिळत नाही आणि सोसायटीची थकबाकी असल्याने व्यक्तिगत नळ जोडणीही मिळत नाही त्यामुळे अशा अनेक सोसायट्यांमधील नागरिकांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आत्तापर्यंत दोन ते अडीच हजार थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यात बहुतांशी सोसायट्यांचा समावेश आहे. अनेक सोसायट्यांमध्ये एकत्रित नळ जोडणी आहे. त्याचे संपूर्ण सोसायटी बिल भरते. परंतु काही अप्रामाणिक सभासद किंवा त्या सोसायटीतील भाडेकरू नियमित मेंटेनन्स फी भरत नाही. तर अनेक भाडेकरूंनी मालकांकडे जमा केले असूनही मालक त्याठिकाणी सोसायटीत रक्कम भरत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सोसायटीने बिल न भरल्याने महापालिकेने नळ जोडण्या बंद केल्या आहेत. परंतु त्यामुळे प्रामाणिकपणे शुल्क भरणाºयांना मात्र पाणी मिळणे बंद झाले आहे. नळ जोडणी सोसायटीच्या नावावर असल्याने त्यांना पाणी मिळत नाही. दुसरीकडे महापालिकेकडे वैयक्तिक नळ जोडणीसाठी अर्ज केल्यास सोसायटीच्या नावावर थकबाकी नको तसेच सोसायटीचा ना हरकत दाखला आणण्यास सांगितले जाते. ते शक्य नसल्याने नियमित शुल्क भरणारा किंवा प्रामाणिक करदात्याला अकारण पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यावर महापालिकेने तोडगा काढावा आणि नियमितपणे बिल भरण्याची तयारी असणाºया सभासदांना अकारण वंचित ठेवू नये, अशी मागणी  होत आहे.कारवाई उचित पण..महापालिकेची थकबाकी भरली नसल्याने सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित केला जातो. त्यानंतर व्यक्तिगत जोडणी दिली तर थकबाकी वसूल होणारच नाही. त्यामुळे महापालिकेने कारवाई त्यांच्यास्तरावर योग्यच ठरवली आहे. तथापि, त्यामुळे जे नियमित शुल्क भरणारे नागरिक आहेत ते मात्र भरडले जात आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक