शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

महापालिकेने ३१ फलकबाजांवर दाखल केले गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:09 IST

नाशिक : महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकारवाई सुरूराजकिय कार्यकर्त्यांना दणका

नाशिक: महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीमुळे शहर फलकमुक्त झाले होते. त्यानंतर मात्र पुन्हा फलक लागण्यास प्रारंभ झाला आहे. आमदार आणि मंत्र्यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाचे फलक लागण्यास सुरुवात झाली आणि आता तर वाढदिवस शुभेच्छांपासून दशक्रिया विधीपर्यंत फलक लागण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षण सुरू असून कोणत्याही क्षणी केंद्र शासनाचे पथक नाशिकमध्ये दाखल होऊ शकते. त्यामुळे स्वच्छतेबाबत दक्षता घेणे सुरू असतानाच शहराच्या विविध भागात फलकबाजांचे पेव फुटले आहे. शहरातील गल्लीबोळात आणि चौकाबरोबरच वाहतूक बेटांवरदेखील फलक लावण्यात येत असल्याने फलकबाजांना आवरण्यासाठी महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सर्वाधिक दहा गुन्हे सिडको भागात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे फलकबाजांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली फलकबाजांवरील कारवाई यापुढेही सुरूच ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ निवडणूक काळातच शहर फलकमुक्त असते मात्र एरवी पुन्हा फलक झळकू लागत असल्याने शहराच्या बकालपणात भर पडते. त्यामुळे ही कारवाई नियमितपणे सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर