लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर राज्य नगरपरिषद संयुक्त कृती समिती व नगरपरिषद कामगार सेनेच्या वतीने एक दिवसाचे प्रतिकात्मक काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला.कामगार संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन उपमुख्याधिकारी प्रवीणकुमार पाटील यांना देण्यात आले. पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा संपूर्ण फरक एकरकमी विनाविलंब मिळावा, रोजंदारी कर्मचाºयांचे रखडलेले समावेशन त्यांच्याच पालिकांमध्ये त्वरित करावे, पालिका कर्मचाºयांना शासकीय कर्मचारी समजून त्यांचे वेतन जिल्हा कोषागार कार्यालयवमार्फत नियमीत व्हावे, सफाई कामगारांना घरे बांधून मिळावी, कर व प्रशासकीय सेवा, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक यांना संवर्गातील वेतनश्रेणी ४ हजार २०० ग्रेड पे प्रमाणे मिळावे, राज्यातील सर्व मनपाच्या सुधारित आकृतिबंध मंजूर करावा, कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासह १५ मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्याम लोंढे, प्रकाश सातभाई, केशव बिवाल, तुषार लोणारी, सुनील जाधव, कृती समितीचे उपाध्यक्ष किशोर भावसार आदींसह पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
येवल्यात विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:00 IST
येवला : विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर राज्य नगरपरिषद संयुक्त कृती समिती व नगरपरिषद कामगार सेनेच्या वतीने एक दिवसाचे प्रतिकात्मक काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला.
येवल्यात विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
ठळक मुद्देकंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे