शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या  शाळांच्या वेळा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:25 IST

गेल्या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळा आता दुपारच्या सत्रात पूर्वीप्रमाणेच करण्याचा मनोदय शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (दि.९) होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक : गेल्या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळा आता दुपारच्या सत्रात पूर्वीप्रमाणेच करण्याचा मनोदय शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (दि.९) होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.  महापालिकेच्या ९० प्राथमिक शाळा असून, सुमारे ३० हजार विद्यार्थी आहेत, तर एक हजाराच्या आसपास शिक्षक आहेत. या शाळांपैकी काही शाळा सकाळच्या सत्रात भरत होत्या, तर काही शाळा दुपारच्या सत्रात भरत होत्या यासंदर्भात शिक्षण विभागाचे माजी प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सर्वच शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार सकाळच्या सत्रात शाळा भरत आहेत. परंतु त्याचा दुसरा नकारात्मक परिणामदेखील दिसून येत आहेत.काही ठिकाणी शिक्षकांचा विरोध असला तरी परिस्थती बघून किमान काही भागांतील शाळांच्या वेळा बदलता येतील, असे सभापती सोनवणे यांनी सांगितले. येत्या बुधवारी (दि.९) शिक्षण समितीची पहिली बैठक होणार आहे. त्यात हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता आहे.शाळा एकत्रिकरणाने वाढल्या समस्यामहापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या १२८ शाळांमधील काही शाळा एकत्र तर काही सुसूत्रीकरण करून ९० शाळा आता तयार केल्या आहेत, परंतु एकत्रीकरणामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या अधिक झाली आहेत आणि त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवरदेखील काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.शाळा या झोपडपट्टी क्षेत्रातमहापालिकेच्या बहुतांशी शाळा या झोपडपट्टी क्षेत्रात आहेत. तेथील मुलांचे पालक हे मोलमजुरीला गेल्यानंतर सायंकाळीच घरी येतात. सकाळच्या सत्रातील मुले दुपारी १२ वाजता घरी आल्यानंतर सायंकाळपर्यंत त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे मुक्त असलेल्या या मुलांना वेगळे वळण लागण्याची शक्यता असते. शिक्षण मंडळाच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे या फुलेनगर परिसराचे प्रतिनिधित्व करीत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा