शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका , पोलीस प्रशासनाचे ‘स्मार्ट नियोजन’ फ सले.; नाशिककरांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:17 IST

‘स्मार्ट रोड’च्या पुढील टप्प्यातील कामाला त्र्यंबक नाक्यापासून सुरुवात करण्यात आल्याने रविवारपासून वाहतूक पोलीस व महापालिकेने त्र्यंबक नाका ते थेट अशोकस्तंभापर्यंत एकेरी वाहतुकीचा मार्ग घोषित केला.

नाशिक : ‘स्मार्ट रोड’च्या पुढील टप्प्यातील कामाला त्र्यंबक नाक्यापासून सुरुवात करण्यात आल्याने रविवारपासून वाहतूक पोलीस व महापालिकेने त्र्यंबक नाका ते थेट अशोकस्तंभापर्यंत एकेरी वाहतुकीचा मार्ग घोषित केला. यानुसार सोमवारी (दि.२६) पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी पर्यायी मार्गावर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आणि महापालिका व पोलीस प्रशासनाचे ‘स्मार्ट नियोजन’ फ सले.  नाशिककर सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांच्या गराड्यात अडकल्याचे चित्र पहावयास मिळाले. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा समावेश झाल्यानंतर रस्ते स्मार्ट क रण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे; मात्र त्यासाठी करण्यात आलेले नियोजन अशास्त्रीय पद्धतीचे असल्यामुळे नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभर रस्त्यांवर कोंडी झाली होती.पर्यायी मार्गावर वाहतुकीचा बोजवाराअशोकस्तंभापासून त्र्यंबक नाक्यापर्यंत जाणारी वाहतूक गंगापूररोडने पंडित कॉलनी, कॅनडा कॉर्नरमार्गे तसेच रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नलवरून शालिमारमार्गे वळविण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन पर्यायी रस्ते ‘जॅम’ झाले होते. एम.जी.रोडवरून आलेली वाहतूक स्तंभाकडे न जाता थेट गोळे कॉलनीमधून गंगापूररोडवर येत असल्याने गोळे कॉलनीमधील अरुंद रस्त्यांवर कोंडी निर्माण झाली. तसेच रविवार कारंजावरून शालिमारकडे जाणारी वाहतूक रेडक्रॉस सिग्नलवर विस्कळीत झाल्यामुळे काही वाहने घनकर गल्लीतून स्तंभावर जाण्याच्या प्रयत्नात असल्याने घनकर गल्ली-अशोकस्तंभ रस्त्यावरही वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.मेहेर चौक ते सीबीएसपर्यंतच्या रस्त्याचे विकासाचे काम मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरू आहे. आता त्यापुढील टप्प्यात सीबीएस ते त्र्यंबक नाका आणि मेहेर ते अशोकस्तंभपर्यंतच्या रस्ता विकासकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. अशोकस्तंभाकडून त्र्यंबक नाक्याकडे जाण्यास वाहनांना मज्जाव करण्यात आला. तसेच मेहेर ते सीबीएस सिग्नलपर्यंतही आता वाहनचालकांना जाता येणार नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसSmart Cityस्मार्ट सिटी